शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

काय मावशी.. ताप आहे काय, रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय गाठून साधला रुग्णांशी संवाद

By महेश सायखेडे | Published: October 06, 2023 6:19 PM

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या

वर्धा : काय मावशी... काय झाले... ताप आहे काय... रक्त तपासले काय अशी भावनिक साद घालत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या येळाकेळी येथील उषा खंगार या महिला रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून विविध विभागाची पाहणी केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुरूवातीला ट्रामा केअर युनिटची पाहणी केली. या विभागात महत्त्वाची ठरणारी सीआप मशीन नादुस्त असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगताच जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधित मशीन तातडीने खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यावर आयुक्तांकडे त्यासंदर्भाने पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने संबंधित मशीन रुग्णालयात कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी अतिदक्षता विभागात जात तेथील सोई-सुविधांची पाहणी केली. शिवाय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागात जात तेथील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, औषध वितरण केंद्र आदीला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे आदींची उपस्थिती होती.

औषधसाठ्याविषयी केली विचारणा

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अस्थिरोग विभाग व ट्रामा केअर युनिटची पाहणी केल्यावर थेट औषधी वितरण केंद्र गाठले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या रांगेत उभे राहून औषधांचे वितरण करणाऱ्यांना औषधसाठा आहे काय असे म्हणत उपलब्ध औषधसाठ्याबाबत विचारणा केली. इतकेच नव्हे तर औषध घेत असलेल्या काही रुग्णांशी संवाद साधला.

डॉ. गाठे यांनी दिली एसएनसीयूची माहिती

बालरोग विभाग आणि एसएनसीयूचे प्रमुख डॉ. संजय गाठे यांनी एसएनसीयूतील सोई-सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना एसएनसीयूमध्ये दाखल असलेल्या नवजात बालके, रेफरीन आणि रेफर आऊट नवजात बालकांविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याच ठिकाणी स्वत:च्या कुटुंबाला दुय्यम स्थान देत रुग्ण सेवा देणाऱ्या चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

स्वच्छतेबाबत व्यक्त केले समाधान

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केल्यावर जिल्हा रुग्णालयाला भेट देण्याच्या कारण स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून येथील आरोग्य सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाने सर्वांनाच मोफत आरोग्य सेवा केल्याने १५ ऑगस्टपासून रुग्णालयातील ओपीडी संख्येत वाढ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या आणि उपलब्ध औषधसाठा याबाबतचीही माहिती आपण आज जाणून घेतली. शिवाय रुग्णांना उत्तम शासकीय आरोग्य सेवा मिळतेय काय याची रुग्णांशी संवाद साधून शहानिशा केली. जिल्हा रुग्णालयात मुबलक औषधसाठा आहे.

- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्यwardha-acवर्धाhospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारीNandedनांदेड