पाणी फाऊंडेशनच्या रकमेची पुरस्कारविजेत्या गावाला प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:46 IST2017-10-26T14:44:40+5:302017-10-26T14:46:35+5:30
५० लाख रूपयाचा पाणी फाऊंडेशनचा पारितोषिक जिंकून देशाच्या नकाशावर नाव निर्माण करणाºया आर्वी तालुक्यातील काकडदरा गावाला अजूनही पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही.

पाणी फाऊंडेशनच्या रकमेची पुरस्कारविजेत्या गावाला प्रतिक्षा
आॅनलाईन लोकमत
वर्धा : ५० लाख रूपयाचा पाणी फाऊंडेशनचा पारितोषिक जिंकून देशाच्या नकाशावर नाव निर्माण करणाºया आर्वी तालुक्यातील काकडदरा गावाला अजूनही पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही. ग्रामसभेचा ठराव नसल्यामुळे गावाचे पॅनकार्ड काढण्यास अडचण आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. गावकºयांसोबत पुरस्कार घेण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आता ‘इव्हेंट संपल्याने’ गावाकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर दिसून आले.
कोलाम समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आर्वी तालुक्यातील काकडदरा या अतिदुर्गम गावाने १९८८ मध्ये जलसंधारणाच्या कामाची मूर्तमढ रोवली. त्यावेळी असेफा या संघटनेच्या मार्फत मधुकरराव खडसे यांनी येथील ग्रामस्थांना जलसंधारणाचा मुलमंत्र दिला. तेव्हापासून काकडदºयाचे ग्रामस्थ दरवर्षी जलसंधारणाचे काम करत आले. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरूवात झाली. त्यावेळी आर्वी तालुक्यातील ५२ गावांना या कामासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. व काकडदराचाही त्यात समावेश होता. या गावातील नागरिकांना श्रमदान व जलसंधारण याची पूर्ण जाण असल्याने या गावावर पाणी फाऊंडेशनने लक्ष केंद्रीत केले. व या गावाने ५० लाख रूपयाचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पटकाविला. व हे गाव राज्यात पहिले पाणीदार गाव ठरले. यावेळी ग्रामस्थांच्या सोबत पाणी फाऊंडेशनचे कार्यकर्तेही पुरस्कार घेण्यासाठी होते. परंतु, जवळ-जवळ चार महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही काकडदºयाला पुरस्काराची रक्कम अजूनही मिळालेली नाही. ग्रामसभेचा ठराव घेवून ग्रामसभेचे पॅनकार्ड काढावे लागणार आहे. ते नसल्यामुळे पुरस्काराची रक्कम ग्रामस्थांना देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये शासनाप्रती प्रचंड नाराजी पसरली आहे. पाणी फाऊंडेशनने इव्हेंट म्हणून या गावाचा वापर करून घेतला. परंतु, या गावाच्या समस्या सरकार दरबारी ग्रामस्थांना मांडू दिल्या नाही. ही बाब श्रीकृष्णदास जाजू स्मृति कार्यक्रमात ग्रामस्थांशी संवाद साधल्यावर उघडकीस आली. या गावासाठी पूर्वीपासून झटणाºया लोकांनाही दुर्लक्षित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. आता ग्रामपंचायत व ग्रामसभा या दोघांच्याही ठरावानंतर गावाचे पॅनकार्ड तयार करण्याचे काम तयार करण्यात येणार असल्याचे गावाचे प्रमुख कार्यकर्ते दौलत घोरनाडे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाणी फाऊंडेशनचे आर्वी तालुका समन्वयक मंदार देशपांडे यांनीही पॅनकार्ड नसल्यामुळे पुरस्काराची रक्कम अद्याप मिळाली नसल्याच्या बाबीला दुजोरा दिला.