पेरणीच्या तोंडावर अडविली शेतीची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:18+5:30
गोजी येथे शेतात जाण्यासाठी शेतकºयांना पूर्वीपासून रस्ता आहे. मात्र, बाहेरगावाहून गोजी येथे येत गणेश माधव शिंदे यांची शेती गणेश चंपत सहस्त्रबुद्धे आणि विनोद सहस्त्रबुद्धे भावडांनी खरेदी केली आणि शेतीकडे जाणारा रस्ता बंद केला. याविषयी तक्रारीनंतर तत्कालीन नायब तहसीलदार करंडे यांनी २००८ मध्ये हा रस्ता मोकळा करून दिला.

पेरणीच्या तोंडावर अडविली शेतीची वाट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगाम जवळ आला असून ऐन पेरणीच्या तोंडावर एका शेतकºयाने वहिवाट रोखल्याने शेती पडीक राहण्याची भीती गोजी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात शेतकºयांनी तहसीलदारांकडे तक्रार केली असून कारवाईकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
गोजी येथे शेतात जाण्यासाठी शेतकºयांना पूर्वीपासून रस्ता आहे. मात्र, बाहेरगावाहून गोजी येथे येत गणेश माधव शिंदे यांची शेती गणेश चंपत सहस्त्रबुद्धे आणि विनोद सहस्त्रबुद्धे भावडांनी खरेदी केली आणि शेतीकडे जाणारा रस्ता बंद केला. याविषयी तक्रारीनंतर तत्कालीन नायब तहसीलदार करंडे यांनी २००८ मध्ये हा रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान वहिवाट सुरळीत असतानाच मागील पंधरवड्यापासून सहस्त्रबुद्धे बंधूंनी त्रास देण्याच्या अनुषंगाने रस्ता बंद केला.
शेतकरी वहिवाट करण्यास गेले असतान सहस्त्रबुद्धे बंधूंनी मारहाण केली. खरीप हंगाम जवळ आला आहे. काही दिवसांतच पेरणीची कामे करावयाची आहेत. मात्र, रस्ताच बंद केल्याने शेती पडीक राहण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे. शेतीचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात गोजी शेतकरी पांडुरंग देवढे, शुभम देवढे, रूपराव चौधरी, विनोद ठाकरे, वामन ठाकरे, प्रभाकर चिरडे, गजानन ठाकरे, चंद्रशेखर भाकरे, बाबा ठाकरे, सुनीता ठाकरे, सुनील मशानकर, संजय ठाकरे आदींनी तहसीलदारांकडे केली आहे.