शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षाच

By admin | Published: January 11, 2017 1:00 AM

केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. अन्य राज्याने याची अंमलबजावणी केली

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मागणी वर्धा : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. अन्य राज्याने याची अंमलबजावणी केली मात्र महाराष्ट्र शासनाने या मागणीची अजूनही दखल घेतलेली नाही. राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ते तीन दिवसीय संप करणार आहे. जिल्ह्यातील शासकीय, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी होणार असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गोवा, उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यांनी सातवा वेतन आयोग लागू केला आहे. उत्तरप्रदेश राज्याने तर १ जुलै २०१६ पासूनचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला आहे. महाराष्ट्र शासन मात्र याबाबत मौन बाळगून आहे. याशिवाय अन्य ३१ मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गत दोन वर्षात लक्षवेध दिन, निषेध दिन, दोन तास जादा काम आंदोलन, आझाद मैदानावर मोर्चा, लाक्षणिक संप असे आंदोलने केली. शासनाबरोबर वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. तरीही शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे समन्वय समितीच्या झालेल्या बैठकीत संपाचा निर्णण घेण्यात आला. राज्यातील १९ लाख कर्मचारी १८ ते २० जानेवारी दरम्यान होत असलेल्या तीन दिवसीय संपात सहभागी होणार आहे. या संपाची माहिती मुख्यमंत्री यांना पत्रातून देण्यात आली आहे. या पत्राची प्रत व मागण्यांची सनद निवेदनासोबत जोडण्यात आली असून हे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले. राज्य सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा व समन्वय समितीने तीन दिवसीय संपात सहभागी होण्याचा निर्धार केला असून जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लोखंडे, विनोद भालतडक, बाबाराव भोयर, संजय ठाकरे, आनंद मुन, दत्ता सहारे, शाम धामंदे, विनोद पोटे, किशोर शेंडे आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)