शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

वाघाचा हैदोस सुरूच; गाय जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:18 PM

वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्षच करीत आहे. भर दुपारी वाघाने गायीवर हल्ला करून तिला जखमी केले. इतकेच नव्हे तर दोन व्यक्तीच्या अंगावर वाघाने चालकरू पाहली. परंतु, वेळीच त्यांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.

ठळक मुद्देवन विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका बघ्याची

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी या भागातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे वन विभाग दुर्लक्षच करीत आहे. भर दुपारी वाघाने गायीवर हल्ला करून तिला जखमी केले. इतकेच नव्हे तर दोन व्यक्तीच्या अंगावर वाघाने चालकरू पाहली. परंतु, वेळीच त्यांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.दुपारी दोन वाजता रामकृष्ण डोंगरे यांच्या गाईवर वाघाने हल्ला करुन तिला जखमी केले. गाईचा कळप जंगलात चरायला गेला असता वाघाने अचानक या जनावरांच्या कळपावर हल्ला केला. यावेळी गुराख्याने आरडा-ओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून धुम ठोकली. याच प्रसंगी त्याच भागातून सतीश बारंगे, नामदेव चिकने हे जात असताना वाघाने त्यांच्या अंगावर चाल करू पाहली. याप्रसंगी सदर दोन्ही व्यक्तींनी थोडा धाडस दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.शेतकऱ्यांसह जंगलव्याप्त भागातील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका न घेता सदर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.वाघाची दहशत; भिवापूर (हेटी) मध्ये दवंडीकारंजा (घा.) - तालुक्यातील जंगलव्याप्त गावातील नागरिकांमध्ये वाघाबाबतची कमालीची दशहत निर्माण झाली आहे. वाघाने आतापर्यंत पिंपरी (लिंगा) व हेटीकुंडी येथे गायीचा फडशा पाडला तर ब्राह्मणवाडा येथे शेळी ठार केली. त्या वाघाने सदर पाळीव प्राणी ठार केले त्याच वाघाने आता आपला मोर्चा भिवापूर हेटी भागाकडे वळविल्याने पोलीस पाटील यांनी गावात दवंडी देत गावातील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. गावालगत असलेल्या काळी या पडीक भागात व्याघ्र दर्शन झाल्याने तसेच वाघाने भैय्याजी साठे यांची गाय ठार केल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.