वडगाव-रेहकी रस्त्याची दैना
By Admin | Updated: August 3, 2014 23:33 IST2014-08-03T23:33:57+5:302014-08-03T23:33:57+5:30
वडगाव-रेहकी या मार्गाची दैनावस्था झाली असून वाहन चालविताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठे खड्डे असून यात पावसाचे पाणी साचते.

वडगाव-रेहकी रस्त्याची दैना
घोराड : वडगाव-रेहकी या मार्गाची दैनावस्था झाली असून वाहन चालविताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठे खड्डे असून यात पावसाचे पाणी साचते. यामुळे रस्त्यावर डबके तयार होते. या साचलेल्या पाण्यामुळे मार्गक्रमण कसे करावे असा प्रश्न निर्माण होत आहे.
वडगाव(कला) येथून रेहकीला जाणारा पांदण रस्त्याचे गत काही वर्षाअगोदर डांबरीकरण करण्यात आले. हा रस्ता वडगाव गावाला सेलू आणि झडशी तसेच रेहकी येथे सेलू व येळाकेळी मार्गाला जोडल्या जातो. यामुळे हा मार्ग महत्त्वाचा आहे. पण वडगाव (कला) येथे रस्त्याच्या सुरुवातीलाच रस्त्याला पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे येथे चिखलाचे साम्राज्य आहे. याशिवाय गावातील सांडपाणी या रस्त्याने वाहत असल्याने रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. संबंधितानी दखल घेण्याची मागणी आहे. (वार्ताहर)