सेवाग्राम आश्रमला उपराष्ट्रपतींची भेट, परिसराची केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 01:17 PM2018-02-25T13:17:25+5:302018-02-25T13:17:25+5:30

उपराष्ट्रपती एम. व्येंकय्या नायडू यांनी रविवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमला भेट दिली.

Visit to Sevagram Ashram, Vice President's visit, Survey of Surroundings | सेवाग्राम आश्रमला उपराष्ट्रपतींची भेट, परिसराची केली पाहणी

सेवाग्राम आश्रमला उपराष्ट्रपतींची भेट, परिसराची केली पाहणी

googlenewsNext

सेवाग्राम (वर्धा)- उपराष्ट्रपती एम. व्येंकय्या नायडू यांनी रविवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. आश्रमात आगमन होताच प्रथम त्यांनी आदी निवासाला भेट दिली. त्यानंतर बापू कुटी व आश्रमातील सर्व परिसराची पाहणी केली. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सुतमाळा व पुस्तक देवून उपराष्ट्रपती नायडू यांचे स्वागत केले. 

बापू कुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना एकादश व्रत व भजन झाले. त्यानंतर बापू कुटीसमोरील वºहांड्यातील चरखाची माहिती त्यांनी जाणून घेतली. येथे काम करणाºया महिलांशी उपराष्टÑपतींनी संवाद साधला. महादेव कुटीतील कापूस ते कापड हा आश्रमचा उपक्रमही त्यांनी समजावून घेतला व त्याची पाहणी केली. याप्रसंगी आश्रमचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी चरखा आणि विणाईला मनरेगात समाविष्ट केले तर ग्रामीण भागात रोजगाराची संधी निर्माण होईल आणि खादीला प्रोत्साहन मिळेल. यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी विनंती केली. 

यावेळी नायडू यांनी हा उपक्रम चांगला आहे याबाबत मी पंतप्रधानांशी चर्चा करतो, असे सांगितले. यावेळी उपराष्ट्रपतींनी देशाच्या अनेक भागात घरे आहेत, परंतु बापू कुटीसारख्या पध्दतीची घरे खुप शितकारक आहे, असे सांगितले. १९३८ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींनी लावलेल्या पिंपळ वृक्षाची माहिती त्यांनी जाणून घेतली व तेथे ते बराच वेळ चिंतन करत बसले. प्रार्थना भूमिची माहितीही त्यांनी जाणून घेतली. आश्रमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी बापू कुटीच्या भेटीत अभिप्राय नोंदविला. यात त्यांनी गांधींचे तत्वज्ञान व गांधीजींचे विचार, कार्यकर्ते यांच्याबद्दल यांचे विचार पुन्हा उजाळा देणारे असले तरी आजच्या दिवसात खादीला प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत नोंदविले. यावेळी आश्रमच्या शोभा कवाडकर, संगीता चव्हाण, प्रभा शहाणे, हिराभाई शर्मा, सिध्देश्वर उमरकर, मिथून हरडे, प्रशांत ताकसांडे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी आदी उपस्थित होते. 

Web Title: Visit to Sevagram Ashram, Vice President's visit, Survey of Surroundings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.