गिट्टीखदान व्यावसायिकांकडून नियमांचा भंग; प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 23, 2014 23:45 IST2014-07-23T23:45:52+5:302014-07-23T23:45:52+5:30
तालुक्यातील सावली(वाघ), सेलू(मुरपाड) या परिसरात गिट्टी खदानाच्या व्यवसायिकांनी संपूर्ण कायदे व नियम धाब्यावर बसवून पैसा लाटण्याच्या गोरखधंदा सुरू केला आहे. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

गिट्टीखदान व्यावसायिकांकडून नियमांचा भंग; प्रशासनाचे दुर्लक्ष
हिंगणघाट : तालुक्यातील सावली(वाघ), सेलू(मुरपाड) या परिसरात गिट्टी खदानाच्या व्यवसायिकांनी संपूर्ण कायदे व नियम धाब्यावर बसवून पैसा लाटण्याच्या गोरखधंदा सुरू केला आहे. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. होणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आला आहे. यावर तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे. मनसे महिला आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शहरानजीक १० कि़मी. अंतरावर सावली(वाघ), सेलू (मुरपाड) शिवारात स्टोन क्रशर व्यावसायिकांनी मोर्चा वळवून गिट्टी खदानचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू केला. या खदानीतून निघणारी बारिक धूळ परिसरात व गावात पसरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदुषणामुळे शेतीपिके तर धोक्यात आली आहेच पण परिसरातील नागरिकांनाही दमा, अस्थमा यासारखे आजार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या खदानीमुळे अवजड वाहतूक वाढली आहे. त्यामुळे सामान्य दळणवळण प्रभावित झाले असून रस्तेही खराब होत आहे.
परिसरातील मार्गाची सुधारणा करून गिट्टी खदान व्यावसायिकांना कायदे व नियमांचे बंधन घालून द्यावे व सामान्य नागरिकांचे आरोग्य जोपासावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीने निवेदनातून केली आहे. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रागिणी शेंडे, जिल्हासचिव सुनिता भितघरे, तालुका अध्यक्ष सुनिता भोयर, तालुका संघटक प्रभा श्रीवास्तव, तालुका उपाध्यक्ष मंगला ठक, अपर्णा नांदूरकर, शिला मेश्राम आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.(तालुका प्रतिनिधी)