गावांमध्ये उघड्यावर हागणदारीचे चित्र कायमच
By Admin | Updated: December 22, 2014 22:52 IST2014-12-22T22:52:58+5:302014-12-22T22:52:58+5:30
ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, लोकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. या अनुदानात वेळावेळी वाढ केल्याने

गावांमध्ये उघड्यावर हागणदारीचे चित्र कायमच
वर्धा : ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, लोकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. या अनुदानात वेळावेळी वाढ केल्याने गावात शौचालयाची संख्या वाढली आहे; परंतु या शौचालयाचा वापर नगण्य होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आजही ग्रामीण भागात ५० टक्यापेक्षा जास्त कुटुंब उघड्यावरच शौच्छविधी करीत असल्याने उघड्यावरील हागणदारी कायम असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रात सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्र्रामस्वच्छता अभियान राबविले जात होते. ग्रामीण भागात सामूदायिक आणि वैद्यकीय स्वच्छतेतून ग्र्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले. त्यांच्या अभूतपूर्व यशानंतर केंद्र शासनाने सन २००५ पासून संपूर्ण देशात निर्मलग्राम योजना सुरू केली. २००५ मध्ये शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाला ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत होते.
निर्मल ग्राम अभियानाची व्याप्ती सन २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रोत्साहीत करण्यात आले. २००८ मध्ये जिल्ह्यातील अनेक ग्रापंचायातींना निर्मलग्राम योजनेचा पुरस्कार देखील मिळाला. तेव्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागात उघड्यावरील हागणदारी काही प्रमाणात कमी देखील झाली होती. २००९ ते २०१२ या कालावधीत शौचालयाला मिळणाऱ्या अनुदानात वाढ झाल्याने लोकांनी शासकीय अनुदान मिळते म्हणून मोठ्या प्रमाणात शौचालय बांधली गेली; परंतु ग्रामीण भागामध्ये या शौचालयाचा वापर पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. घरी शौचालय असताना देखील बहुतांश नागरिक उघड्यावरच शौचविधी करीत असल्याने जिल्हा तसेच तालुक्याची परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणात बदलली नाही. त्यामुळे बहुतेक ग्रामपंचायतीत उघड्यावरील हागणदारी सर्रास सुरू आहे.
(शहर प्रतिनिधी)