महिलेच्या मृत्यूने गावात तणाव
By Admin | Updated: August 22, 2015 02:15 IST2015-08-22T02:15:10+5:302015-08-22T02:15:10+5:30
इंजेक्शनमुळे आलेल्या गाठीमुळेच खैरूननीसा शेख ताजू रा. आंजी (मोठी) हिला ताप येवून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी शुक्रवारी येथील आरोग्य केंद्रात चांगलाच धुडघूस घातला.

महिलेच्या मृत्यूने गावात तणाव
आकोली : इंजेक्शनमुळे आलेल्या गाठीमुळेच खैरूननीसा शेख ताजू रा. आंजी (मोठी) हिला ताप येवून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी शुक्रवारी येथील आरोग्य केंद्रात चांगलाच धुडघूस घातला. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला.
खैरूननीसा शेख ताजू नामक महिलेला १० जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेल्या इंजेक्शनची कमरेला गाठ आली. यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात चर्चाही करण्यात आली. तिथे १८ पर्यंत मलमपट्टीही करण्यात आली. मात्र उपयोग होत नसल्याने डॉ. झोडे यांनी तिला सेवाग्रामाला पाठविले. यात तिचा गुरुवारी मृत्यू झाला.
यामुळे संतापलेल्या नागरिकांनी दवाखान्यात गर्दी केली. यावेळी जि.प. आरोग्य सभापती मिलिंद भेंडे, ठाणेदार प्रशांत पांडे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतकाचे नातेवाईक व जमावाची समजून घातली. अंत्यसंस्कारासाठी निधी दिला व आर्थिक मदतीचे आश्वासन देत प्रकरण हाताळले. यावेळी गुलजारखाँ पठाण, ईस्माईलशेख, नौशाद शेख, तंमुस, अध्यक्ष किशोर चंदनखेडे, सरपंच जगदीश संचरिया, ग्रामसुरक्षा दलाचे बंडू मुळे यांनी मुस्लीम बांधवांची समजून घातली व प्रकरण चिघळू न देता सामजस्याने तोडगा काढला.
आरोग्य विभागाचे केंद्रीय पथक वर्धेत आल्यामुळे जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी आंजीला येवू शकले नाही, असे सांगण्यात आले.(वार्ताहर)