विकिलची आत्महत्या की हत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:00:27+5:30

विकिलचा मृतदेह आढळून येण्याच्या पूर्वीच्या दिवशी रात्री तो मित्रासोबत बाहेर होता. त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या जखमा होत्या. विकिल हा यवतमाळ येथील रेमंड कंपनीत काम करायचा. लॉकडाऊनमुळे तो त्याच्या मुळगावी परतला. शिवाय तो सर्वांशी मिळून मिसळून राहत होता. शिवाय तो अविवाहित होता.

Vikils suicide or murder? | विकिलची आत्महत्या की हत्या?

विकिलची आत्महत्या की हत्या?

ठळक मुद्देकुटुंबीयांचा आरोप : शरीरावर आढळल्या मारहाणीच्या जखमा

लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : नजीकच्या बोरगाव (आलोडे) येथील विकिल अशोक वटाणे (२४) याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत २० एप्रिलला आढळून आला. परंतु, त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने विकिलची नियोजनबद्धपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
विकिलचा मृतदेह आढळून येण्याच्या पूर्वीच्या दिवशी रात्री तो मित्रासोबत बाहेर होता. त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या जखमा होत्या. विकिल हा यवतमाळ येथील रेमंड कंपनीत काम करायचा. लॉकडाऊनमुळे तो त्याच्या मुळगावी परतला. शिवाय तो सर्वांशी मिळून मिसळून राहत होता. शिवाय तो अविवाहित होता. परंतु, अचानक त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याचा कुणी आत्महत्येस प्रवृत्त तर केले नाही ना असा संशय त्याच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अल्लीपूर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विकिलच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी केली आहे. हे प्रकरण पुढे काय नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vikils suicide or murder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून