शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्यासाठी ‘विदर्भमुक्ती मार्च’

By admin | Updated: April 27, 2016 02:17 IST

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या बऱ्याच काळात विदर्भावर अन्याय, अत्याचार झाले. शेतकरी आत्महत्याचे वाढते प्रमाण विकासाचा अनुशेष, ...

जोगेंद्र कवाडे : वैदर्भीयांचा अपमान खपवून घेणार नाही पुलगाव : महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या बऱ्याच काळात विदर्भावर अन्याय, अत्याचार झाले. शेतकरी आत्महत्याचे वाढते प्रमाण विकासाचा अनुशेष, पाण्याची टंचाई, रोजगाराचा अभाव असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने वेगळे विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे. वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी तेलंगणाच्या धर्तीवर आंदोलन होणे आवश्यक असून आपण विदर्भवादी मंडळींना सोबत घेवून, आमगाव ते खामगाव असा विदर्भ मुक्ती मार्च काढणार असल्याचा निर्धार पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केला.‘विकासाच्या संदर्भात आवश्यक त्याबाबींनी परिपूर्ण असा हा विदर्भ असून एकेकाळी प्रांत वऱ्हाड अन् आहे सोन्याची कुऱ्हाड’ असे या विदर्भाला म्हटल्या जात होते; परंतु काही मंडळींनी विदर्भाकडे पाठ फिरविली. त्यामुळे विकासाचा अनुशेष राहिला. विदर्भातला माणूस आळशी आहे, असे म्हणून काहींनी आमची चेष्टा केली. हा वैदर्भियांचा अपमान आपण कदापी खपवून घेणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले. पुलगाव भूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झाली असून विदर्भराज्य निर्मिती चळवळीत या शहराचे महत्त्वाचे योगदान आहे. म्हणून विदर्भमुक्ती आंदोलनाचे रणशिंग पुलगावातून फुंकले जाईल, असे आ. कवाडे यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ वा आगमनदिन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते पुलगावात आले. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक बुद्ध विद्या विहारात सोमवरी संपन्न झालेल्या आगमनदिन कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रेम भिमटे होते. याप्रसंगी प्रबोधनकार प्रवीण कांबळे व संच यांनी भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमापूर्वी आ. कवाडे यांनी नगर परिषद प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले तर येथून प्रमुख अतिथीसह कार्यकर्त्यांनी अभिवादन रॅली काढली. या कार्यक्रमास विहार समिती पदाधिकाऱ्यासह मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)