शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

परिसरात गावठी दारूविक्रीला उधाण

By admin | Updated: July 27, 2014 23:54 IST

वर्धमनेरी, जळगाव, भारसवाडा, सारवाडी, तळेगाव(श्या.) या पाचही गावात गावठी दारू विक्रीला उधाण आले आहे. तसेच तळेगावात गावठी दारूसह देशी-विदेशी दारूच्या बारसारखी व्यवस्था उपलब्ध आहे.

तळेगाव (श्या.) : वर्धमनेरी, जळगाव, भारसवाडा, सारवाडी, तळेगाव(श्या.) या पाचही गावात गावठी दारू विक्रीला उधाण आले आहे. तसेच तळेगावात गावठी दारूसह देशी-विदेशी दारूच्या बारसारखी व्यवस्था उपलब्ध आहे. यामुळे युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. महिलांच्या छेडखानीच्या तक्रारीसुद्धा वाढायला लागल्या आहेत. त्यामुळे या दारूविके्रत्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहे.काही गावात दारू मिळत नसल्याने या गावातील मद्यपी तळेगाव येथे दारू पिण्यासाठी येतात. त्यामुळे रस्त्याने जाताना शिवीगाळ, भांडणे हा दारूड्यांचा नित्यक्रमच बनला आहे. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे या गावातील महिला एल्गार पुकारण्याच्या प्रयत्नात आहे. चोवीस तास होणाऱ्या दारू विक्रीमुळे गावातील नागरिकांना, महिलांना रोज नवीन तमाशा अनुभवास मिळतो. गावातील या दारू विक्रेत्यांना प्रशासनाचा धाकच उरला नसल्याचे दिसून येत आहे. दारूविक्रीमुळे गावातील शांतता भंग पावत चालली आहे. महिला आणि विशेष करून युवती याबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आहे. तळेगावात अवैधरित्या गावठी व देशी-विदेशी दारूचे तीन मोठे ठिय्ये आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथे तीन, भारसवाडा येथे दोन तर सारवाडी येथे दारूचे दोन ठिय्ये आहेत. हे सर्व माहीत असतानाही येथील पोलीस मात्र चुप्पी साधून बसल्याचे येथील महिलांचे म्हणणे आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये राजरोसपणे दारूची विक्री सुरू असल्याने अनेकांच्या संसारांमध्ये रोजची भांडणे वाढली आहेत. तळेगावात तर दारूचा महापूर असल्याची स्थिती आहे. गावातील अवैधधंदे बंद न झाल्यास तसेच अशीच दारूविक्री सुरू राहिली तर पोलीस ठाण्यासमोर दारू विकण्याचा धंदा करू असा विचार काही महिलांनी बोलून दाखविला. त्यामुळे तळेगावसह इतर गावात होत असलेली दारूविक्री थांबवावी अशी मागणी केली जात आहे.(वार्ताहर)