उभ्या टिप्परला टँकरची धडक, टँकरचे चालक, वाहक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST2022-02-16T05:00:00+5:302022-02-16T05:00:21+5:30
नागपूर ते तुळजापूर महामार्गाने जात असताना वर्धा ते पवनारदरम्यान एमएच ४० सीडी ४४१५ क्रमांकाचा टिप्पर पंक्चर झाला. त्यामुळे चालकाने महामार्गाच्या एका बाजूला टिप्पर उभा करून आजूबाजूला दगड व झाडाच्या फांद्या लावून ठेवल्या होत्या. शिवाय टिप्परचे रिफ्लेक्टरही सुरू होते; पण भरधाव येणाऱ्या एम.एच. ४९-९९९१ क्रमांकाच्या टँकर चालकाला उभा टिप्पर दिसला नसल्याने मागून जोरात धडक दिली.

उभ्या टिप्परला टँकरची धडक, टँकरचे चालक, वाहक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : नागपूर-तुळजापूर महामार्गावर पवनारनजीकच्या मामा-भांज्याच्या दर्गाहजवळ टिप्पर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभा होता. यावेळी मागून भरधाव येणाऱ्या टँकर चालकाने उभ्या टिप्परला जबर धडक दिली. यात टँकरचा चालक व वाहक दोघेही गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान झाला.
नागपूर ते तुळजापूर महामार्गाने जात असताना वर्धा ते पवनारदरम्यान एमएच ४० सीडी ४४१५ क्रमांकाचा टिप्पर पंक्चर झाला. त्यामुळे चालकाने महामार्गाच्या एका बाजूला टिप्पर उभा करून आजूबाजूला दगड व झाडाच्या फांद्या लावून ठेवल्या होत्या. शिवाय टिप्परचे रिफ्लेक्टरही सुरू होते; पण भरधाव येणाऱ्या एम.एच. ४९-९९९१ क्रमांकाच्या टँकर चालकाला उभा टिप्पर दिसला नसल्याने मागून जोरात धडक दिली. यात टँकरच्या केबीनचा चुराडा झाला असून, चालक राजेश पाटील (४३) व वाहक अशोक बुराडे (३५) दोघेही रा. भंडारा हे गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना सुरुवातीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना सावंगीच्या रुग्णालयात हलविण्यात आले. यातील वाहकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरच्या रुग्णालयात पाठविल्याचे सांगण्यात आले. अपघाताची सेवाग्राम पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
अनियंत्रित कार झाडाला धडकली
- पुलगाव : भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली उतरून झाडाला धडकली. हा अपघात पुलगाव-शिरपूर मार्गावरील नाचणगाव शिवारात घडला. या अपघातात कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही कार रस्त्याच्या कडेला आतमध्ये शिरल्याने बाहेर काढण्याकरिता जेसीबी बोलवावा लागला. जेसीबीच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली.