टायर फुटल्याने केमिकल्स पावडरने भरलेले वाहन पलटी होऊन चालक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:12 IST2020-05-09T19:11:13+5:302020-05-09T19:12:23+5:30
तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील बरबडी शिवारात नागपूर कडुन चंद्रपूर कडे जात असलेल्या केमिकल्स पावडरने भरलेल्या वाहनाचा टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन चालक गंभीर जखमी झालाची घटना उघडकीस आली आहे.

टायर फुटल्याने केमिकल्स पावडरने भरलेले वाहन पलटी होऊन चालक गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा( समुद्रपुर): तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील बरबडी शिवारात नागपूर कडुन चंद्रपूर कडे जात असलेल्या केमिकल्स पावडरने भरलेल्या वाहनाचा टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन चालक गंभीर जखमी झालाची घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नाव यशवंत रविंद्र कळमकर वय २७ वर्ष राहणार तिगाव हा नागपूर वरुन आपले वाहन क्रमांक एम एच ३२ ए जे १७७९ ने चंद्रपुर कडे केमिकल्स पावडर घेऊन जात असताना बरबडी शिवारात त्याच्या वाहनाचा मागचा टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन पलटी झाल। या अपघात।त चालक यशवंत कळमकर गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकीचे साय्यहक पोलिस निरीक्षक पाटील यांना मिळताच शरद इंगोले, शेखर डोंगरे,ज्योती राऊत, यांनी घटनाथळ गाठून जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करीत अपघातग्रस्त वाहनाला रस्त्याच्या कडेला करीत वाहतूक सुरळीत केली आहे.