शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

गिरड परिसरात बहरणार देशी कापसाचे वाण

By admin | Updated: June 22, 2016 02:06 IST

केंद्र शासनाच्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या उपक्रमाद्वारे समुद्रपूर तालुक्यातील गिरडसह परिसरातील पाच गावात आदिवासी शेतकऱ्यांना देशी कापूस लागवडीस ...

आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा : भारतीय कापूस अनुसंधान संस्थेचा उपक्रमगिरड : केंद्र शासनाच्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या उपक्रमाद्वारे समुद्रपूर तालुक्यातील गिरडसह परिसरातील पाच गावात आदिवासी शेतकऱ्यांना देशी कापूस लागवडीस भारतीय कापूस संशोधन संस्थेच्यावतीने प्रात्याक्षिक देण्यात आले. या पाच गावातील चाळीस शेतकऱ्यांचा एका एकरावरील होणारा बियाणे, खत व औषधावरील खर्च वाचला आहे. या गावांमध्ये देशी कापसाचे वाण बहरणार आहे. पहिल्यादांच बिटी कापूस आणि देशी कापूस यातील तुलनात्मक अभ्यास या शेतकऱ्यांच्या शेतात होणार आहे. यामुळे पुढील वर्षात शेतकऱ्यांना घरचे कापूस बियाणे राखणे आणि लागवड करणे सोईचे होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या कार्यक्रमांतर्गत आईसीएआर केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील चार शास्त्रज्ञाची गिरड समुहातील मोहगाव, आर्वी, फरीदपूर, जोगीनगुंफा व शिवनफळ या गावांची निवड केली आहे. यामध्ये डॉ. नंदिनी गोगटे, डॉ. सर्वानन, डॉ. शैलेश गावंडे, डॉ. जोय दास या चार प्रमुख शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यांतर्गत ही चमू वेळोवेळी या पाच गावांना भेट देवून शेतकऱ्यांच्या कृषी विषयक तसेच कपाशी पिकासंदर्भात तांत्रिक अडचणींचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यांतर्गत गिरड येथील मगन संग्रहालय समिती कार्यालय येथे आईसीएआर केंद्रीय कापूस संशोधन संस्था आदिवासी उपायोजनेच्या माध्यमातून गिरड समुहातील शिवनफळे, आर्वी, मोहगाव व फरीदपूर या चार गावातील ४० आदिवासी शेतकऱ्यांना देशी कपाशीच्या बियाणांचे मोफत वितरण व मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या ४० आदिवासी शेतकऱ्यांना २ किलो देशी कपाशी (अर्धा एकर ६० बाय ३० अंतराने), १ किलो गवार, (३ मीटरच्या ४५ बाय १० च्या अतराने दोन ओळी) तसेच बीटी कपाशीची १ थैली (४५० ग्राम, अर्धा एकर ९० बाय ३० अंतराने) या प्रमाणे प्रत्येकी एक एकर प्रात्याक्षिकासाठी बियाण्याचे वितरण करण्यात आले. कपाशीवरील खर्च खूप वाढला आहे. तो शाश्वत आणि शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून कसा कमी करता येईल या उद्देशाने कपाशीचे देशी वाण देण्यात आले आहे. यामध्ये रोग आणि कीट प्रतिकारशक्ती असून कोरडवाहू शेतीसाठी ती उपयुक्त आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे देशी विरूद्ध बीटी असा तुलनात्मक अभ्यास करून व तो शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या आधाराने पटवून देण्याच्या उद्देशाने प्रत्येकी एका एकर प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.(वार्ताहर)