गिरड परिसरात बहरणार देशी कापसाचे वाण

By Admin | Updated: June 22, 2016 02:06 IST2016-06-22T02:06:04+5:302016-06-22T02:06:04+5:30

केंद्र शासनाच्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या उपक्रमाद्वारे समुद्रपूर तालुक्यातील गिरडसह परिसरातील पाच गावात आदिवासी शेतकऱ्यांना देशी कापूस लागवडीस ...

Varieties of indigenous cotton growling in the Girid area | गिरड परिसरात बहरणार देशी कापसाचे वाण

गिरड परिसरात बहरणार देशी कापसाचे वाण

आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा : भारतीय कापूस अनुसंधान संस्थेचा उपक्रम
गिरड : केंद्र शासनाच्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या उपक्रमाद्वारे समुद्रपूर तालुक्यातील गिरडसह परिसरातील पाच गावात आदिवासी शेतकऱ्यांना देशी कापूस लागवडीस भारतीय कापूस संशोधन संस्थेच्यावतीने प्रात्याक्षिक देण्यात आले. या पाच गावातील चाळीस शेतकऱ्यांचा एका एकरावरील होणारा बियाणे, खत व औषधावरील खर्च वाचला आहे. या गावांमध्ये देशी कापसाचे वाण बहरणार आहे.
पहिल्यादांच बिटी कापूस आणि देशी कापूस यातील तुलनात्मक अभ्यास या शेतकऱ्यांच्या शेतात होणार आहे. यामुळे पुढील वर्षात शेतकऱ्यांना घरचे कापूस बियाणे राखणे आणि लागवड करणे सोईचे होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘मेरा गाव मेरा गौरव’ या कार्यक्रमांतर्गत आईसीएआर केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील चार शास्त्रज्ञाची गिरड समुहातील मोहगाव, आर्वी, फरीदपूर, जोगीनगुंफा व शिवनफळ या गावांची निवड केली आहे. यामध्ये डॉ. नंदिनी गोगटे, डॉ. सर्वानन, डॉ. शैलेश गावंडे, डॉ. जोय दास या चार प्रमुख शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यांतर्गत ही चमू वेळोवेळी या पाच गावांना भेट देवून शेतकऱ्यांच्या कृषी विषयक तसेच कपाशी पिकासंदर्भात तांत्रिक अडचणींचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यांतर्गत गिरड येथील मगन संग्रहालय समिती कार्यालय येथे आईसीएआर केंद्रीय कापूस संशोधन संस्था आदिवासी उपायोजनेच्या माध्यमातून गिरड समुहातील शिवनफळे, आर्वी, मोहगाव व फरीदपूर या चार गावातील ४० आदिवासी शेतकऱ्यांना देशी कपाशीच्या बियाणांचे मोफत वितरण व मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या ४० आदिवासी शेतकऱ्यांना २ किलो देशी कपाशी (अर्धा एकर ६० बाय ३० अंतराने), १ किलो गवार, (३ मीटरच्या ४५ बाय १० च्या अतराने दोन ओळी) तसेच बीटी कपाशीची १ थैली (४५० ग्राम, अर्धा एकर ९० बाय ३० अंतराने) या प्रमाणे प्रत्येकी एक एकर प्रात्याक्षिकासाठी बियाण्याचे वितरण करण्यात आले. कपाशीवरील खर्च खूप वाढला आहे. तो शाश्वत आणि शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून कसा कमी करता येईल या उद्देशाने कपाशीचे देशी वाण देण्यात आले आहे. यामध्ये रोग आणि कीट प्रतिकारशक्ती असून कोरडवाहू शेतीसाठी ती उपयुक्त आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे देशी विरूद्ध बीटी असा तुलनात्मक अभ्यास करून व तो शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या आधाराने पटवून देण्याच्या उद्देशाने प्रत्येकी एका एकर प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.(वार्ताहर)

Web Title: Varieties of indigenous cotton growling in the Girid area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.