सीसीआयच्या वजन काट्यात तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:13+5:30

तालुक्यातील अडेगाव येथील शेतकरी राजू सेलसुरकर यांनी २८ क्विंटल ८० किलो वजानाची कापूस गाडी बाजारात विकायला आणली. या कापसाची खरेदी सीसीआयने केल्याने साबाजी जिनिंगमध्ये वजन केले असता २८ क्विंटल ६० किलोच भरली. शेतकऱ्याने हा कापूस घरुनच मोजून आणल्याने हा फरक शेतकऱ्याला कळला. त्यामुळे सेलसुरकर यांनी बाजार समितीकडे तक्रार केली.

Variation in CCI weight cut | सीसीआयच्या वजन काट्यात तफावत

सीसीआयच्या वजन काट्यात तफावत

Next
ठळक मुद्देग्रेडर व मालकाचे संगनमत : साबाजी जिनिंगमधील खरेदी बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : येथील साबाजी जिनिंगमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरु आहे. येथे शेतकऱ्याने घरुन मोजून आणलेला कापूस वीस किलोने कमी भरला. त्यामुळे शेतकऱ्यालाही आश्चर्याचा धक्काच बसल्याने त्याने बाजार समितीकडे तक्रार केली. जिनिंग मालक व ग्रेडरच्या संगनमताने अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याचा आरोप होत असल्याने बाजार समितीने साबाजी जिनिंगमधील कापूस खरेदी आजपासून थांबविली आहे.
तालुक्यातील अडेगाव येथील शेतकरी राजू सेलसुरकर यांनी २८ क्विंटल ८० किलो वजानाची कापूस गाडी बाजारात विकायला आणली. या कापसाची खरेदी सीसीआयने केल्याने साबाजी जिनिंगमध्ये वजन केले असता २८ क्विंटल ६० किलोच भरली. शेतकऱ्याने हा कापूस घरुनच मोजून आणल्याने हा फरक शेतकऱ्याला कळला. त्यामुळे सेलसुरकर यांनी बाजार समितीकडे तक्रार केली. तक्रारीनंतर बाजार समितीने साबाजी जिनिंगच्या वजन काट्याचा पंचनामा केला असता २ टन वजनामागे दहा किलोचा फरक आढळून आल्याचे सांगण्यात आले. तर जिनिंग मालकाने वजन काट्यात कोणताही फरक आढळून आला नाही, असे सांगितले. या सर्व प्रकारावरुन बाजार समिती आणि जिनिंग मालकांच्या तपासणीत एकवाक्यता येत नसल्याने वजन काट्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
आतापर्यंत या वजन काट्यावर अनेक शेतकऱ्यांना गंडविल्याचा आरोप होत असल्याने बाजार समितीने साबाजी जिनिंगमधली कापूस खरेदी बंद केली आहे. आता पुढे काय कारवाई होते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सीसीआयकडून ३० हजार क्विंटल कापसाची खरेदी
लांब धाग्याच्या कापसाची बाजारपेठ म्हणून देवळीचा विदर्भात नावलौकीक आहे. मागील वर्षी या केंद्रावर सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. या हंगामात आजपर्यंत साठ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत सीसीआयचे दर बऱ्यापैकी असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ओढा सीसीआयकडे आहे. याचाच फायदा सीसीआयकडून उचलत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
येथील ज्योतवाणी, साबाजी व श्रीकृष्ण या तीन जिनिंगसोबत सीसीआयचा कापूस खरेदीचा करार झाला आहे. परंतु, वजनकाट्याच्या कारणामुळे शुक्रवारपासून साबाजी जिनिंगमधील खरेदी बंद केल्याने उर्वरीत दोन जिनिंगमध्ये खरेदी सुरू आहे. शुक्रवारपर्यंत या तीन जिनिंगमध्ये ३० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. या भागातील कापसात प्रती क्विंटल मागे ३६ किलोपर्यंत रूईचे प्रमाणे असल्याने आर्थिक फायद्यासाठी हा सर्व प्रकार होत असून तिन्ही केंद्रावर चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Variation in CCI weight cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.