शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

Vardha: क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांची पोलिसांनी उडविली दांडी, सहा आरोपींना अटक, दोन कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By आनंद इंगोले | Updated: April 12, 2023 18:47 IST

Crime News: दिल्ली येथील आयपीएल क्रि केट सुरु असून यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची माहिती वर्ध्यातील क्राईम इंटेलिजन्स पथक व सायबर सेलला मिळाली. या माहितीच्या आधारे वर्धा आणि टाकळघाट या ठिकाणी धाड टाकून सहा जुगा-यांची दांडी उडविली.

- आनंद इंगोलेवर्धा - दिल्ली येथील आयपीएल क्रि केट सुरु असून यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची माहिती वर्ध्यातील क्राईम इंटेलिजन्स पथक व सायबर सेलला मिळाली. या माहितीच्या आधारे वर्धा आणि टाकळघाट या ठिकाणी धाड टाकून सहा जुगा-यांची दांडी उडविली. त्यांच्याकडून दोन कारसह मोबाईल आणि इतर वस्तू असा एकूण ४९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गणेश राठी रा. भामटीपुरा, सलमान रज्जाक मेमन (२७) रा. शास्त्री चौक, जितेंद्र रंजित तिवारी (३४) रा. रामनगर सिंदीनाका, माधव इश्वरदास नानवाणी (३४) रा. दयालनगर, मुकेश अनिल मिश्रा (३३) रा. परदेशीपुरा, रिकेश मनोज तिवारी (२७) रा. वैद्य ले आऊट असे अटक करणाºया आलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील भामटीपुरा परिसरातील गणेश राठी हा व्यक्ती अ‍ॅन्ड्राईड मोबाईलवर आयपीएल टी-२०-२० या दिल्ली विरुद्ध मुंबईच्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून गणेश राठी याला ताब्यात घेतले.

त्याच्या मोबाईलचा संदेश बॉक्स तपासला असता मोबाईल क्रमांक ७३८७१८८३९७ वरुन दिल्ली विरुध्द मुंबई या मॅचच्या १० ओव्हरमध्ये ७० रन होतील असे २ हजार रुपयांचा जुगार लावला होता. हा मोबाईल क्रमांक सलमान रज्जाक मेमन याचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तो मोबाईल क्रमांक बुट्टीबोरी लगतच्या टाकळघाट येथे असल्याने तांत्रिक माहितीवरुन पुढे आले. त्यामुळे पोलिस पथक आणि पंच टाकळघाटमध्ये पोहचले. तेथील लिंक बिल्डींगच्या तिसºया माळ्यावरील फ्लॅट क्रमांक १० मध्ये धडक दिली. तेथे पाचही आरोपी सट्टा घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ४० मोबाईल, ३ लॅपटॉप, ४ माईक, २ मोबाईल रिसिव्हर आणि दोन कार, असा एकूण ४९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, विनीत घागे याच्यासह निलेश कट्टोजवार, रोशन निंबोलकर, दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, सागर भोसले, अंकित जिभे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, गोविंद मुंडे, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, प्रफुल वानखेडे यांनी केली.

सहा वर्षातील पहिली कारवाई: नुरुल हसनवर्ध्यातील भामडीपुरा परिसरात एक व्यक्ती आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावत असल्याची माहिती ११ एप्रिलला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गणेश राठी याला ताब्यात घेत मोबाईल तपासला असता पुढील धागेदोरे गवसले. हे फार मोठे रॅकेट असल्याचे पुढे आल्याने तांत्रिक माहितीच्या आधारे टाकळघाट येथून पाच आरोपींना अटक करण्यात आली. या जुगारामध्ये वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यातीलही जुगाºयांचा सहभाग असून त्यांचाही तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. हे जुगारी एकापेक्षा जास्त दुसºयाच्या नावाचे सिमकार्ड वापरुन क्रिकेटचा जुगार खेळत होते. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून ते लोकांची फसवणूक करीत होते. त्यामुळे विविध कलमान्वये सहा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ४९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या सहा वर्षाच्या काळामध्ये जुगाराप्रकरणी ही पहिलीच मोठी कारवाई आहे, असे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडीवर्ध्यातील गणेश राठी या एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर शहरातीलच परंतु टाकळघाट येथे क्रिकेट सट्टा चालविणाºया सलमान रज्जाक मेमन, जितेंद्र रंजित तिवारी, माधव इश्वरदास नानवाणी, मुकेश अनिल मिश्रा व रिकेश मनोज तिवारी या पाच आरोपींना अटक केली. सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता सहाही आरोपींना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे यात आणखी काही बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी