संविधानातील मूल्ये अंगिकारावी
By Admin | Updated: November 27, 2015 02:18 IST2015-11-27T02:18:17+5:302015-11-27T02:18:17+5:30
भारतीय संविधानातील प्रत्येक मुल्यांची जपणूक करून सर्वांनीच त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.

संविधानातील मूल्ये अंगिकारावी
आशुतोष सलील : संविधान जनजागरण रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
वर्धा : भारतीय संविधानातील प्रत्येक मुल्यांची जपणूक करून सर्वांनीच त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. गुरुवारी भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
भारतीय संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सामूहिकपणे प्रास्ताविकेचे वाचन केले. तसेच भारतीय संविधानातील मूल्यांचे जतन करतानाच ते अंगिकारण्याचा संकल्प केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित संविधान दिनाच्या मुख्य समारंभास खा. रामदास तडस, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, समाज कल्याण सभापती वसंत पाचोडे उपस्थित होते.
भारतीय संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथून संविधान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. खासदार रामदास तडस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करून जनजागरण रॅलीस हिरवी झेंडी दाखवितली.
प्रारंभी सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी स्वागत करून प्रमुख पाहुण्यांना भारतीय संविधानाची प्रत दिली. यावेळी समाज कल्याण विभागाचे दीपा हेरोळे, समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबा शंभरकर, अनिल वाळके इतर सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांची विशेष उपस्थिती होती. या रॅलीत विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.