अवकाळीचा लपंडाव, फळबागायतदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:14+5:30

मार्च महिन्यानंतर अवकाळी पावसाने एप्रिलमध्ये दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले. मे च्या पहिल्या आठवड्यापासून अधूनमधून वादळीवाऱ्यासह पावसाचे आगम होत आहे. जिल्ह्यातील सेलू तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

Untimely lapandav, fruit growers panicked | अवकाळीचा लपंडाव, फळबागायतदार धास्तावले

अवकाळीचा लपंडाव, फळबागायतदार धास्तावले

ठळक मुद्देउकाड्यात प्रचंड वाढ : तीन महिन्यांपासून अवकाळीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मार्च महिन्यापासून जिल्ह्यात सातत्याने अवकाळी वादळीवाऱ्यासह पाऊस थैमान घालत आहे. यामुळे फळ उत्पादक शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. वातावरणात सातत्याने बदल होत नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
मार्च महिन्यानंतर अवकाळी पावसाने एप्रिलमध्ये दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले. मे च्या पहिल्या आठवड्यापासून अधूनमधून वादळीवाऱ्यासह पावसाचे आगम होत आहे. जिल्ह्यातील सेलू तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
याशिवाय गोविंदपूर, सेलू काटे, येरणगाव, चिकणी (जामणी), चितोडा, बरबडी व अन्य भागात कलिंगड, खरबूज आदी हंगामी फळपिकांसह भाजीपाल्याची लागवड लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने सेलू, घोराड, कोटंबा आदी भागांत केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊसला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांचे हंगामी पिकावरच खरिपाचे नियोजन असते. वादळी वाऱ्यासह सातत्याने येणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यानचे हे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. बुधवारी रात्रीही शहरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. परिणामी, गुरुवारी वातावरणात कमालीचा उकाडा होतो. तीन महिन्यांपासून सातत्याने अवकाळी पाऊस थैमान घातले असून शेतकरी धास्तावले असून शहरी नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

वीज वितरणचे तीस लाखांवर नुकसान
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे वीज वितरणला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील गुरुवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सेलू तालुक्यात वीजखांबाचे मोठे नुकसान झाले. आतापावेतो वीज वितरणचे ३० लाखांवर नुकसान झाल्याची माहिती आहे. अवकाळीमुळे कंत्राटी आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर दुरुस्ती कामाचा अतिरिक्त ताण वाढत आहे.

Web Title: Untimely lapandav, fruit growers panicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस