शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालणार अनारक्षित विशेष गाड्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:59 IST

Wardha : वर्धा स्थानकावरून सुटेल चार विशेष ट्रेन मध्य रेल्वेकडून सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मध्य रेल्वेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १२ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चार विशेष ट्रेन चालणार आहे. एक विशेष ट्रेन कलबुरार्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालेल. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष चार गाड्यांची सुविधा असणार आहे.

यात विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी रात्री ११:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री ११:४५ वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी ३:५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसन्या दिवशी सकाळी १०:५५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना सेवाग्राम, वर्धा, पुलगाव स्थानकावर थांबणार आहेत.

विशेष गाडी क्रमांक ०१२६२, ०१२६४ आणि ०१२६६ या विशेष साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे आहेत. विशेष गाडी क्रमांक ०२०४० नागपूर येथून ७ डिसेंबर रोजी दुपारी ०१:२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४:१० वाजता पोहोचेल. या गाड्या वर्धा, पुलगाव स्थानकांवर थांबेल. या गाडीची संरचना विशेष गाडी क्रमांक ०२०४० साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे अशी आहे. नागरिकांनी विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्ये रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. 

वर्धा स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदीवर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आणि विविध रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने वर्धा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची राहणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवशी देशातील विविध प्रांतातून मुंबईत प्रचंड संख्येत बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर अगोदरच्या दोन-तीन दिवसांपासूनच प्रचंड गर्दी उसळते. अशात अनेक जण गावाला जाणाऱ्या किंवा गावाहून परत येणाऱ्या आपल्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वे स्थानकावर पोहोचतात. त्यामुळे गर्दीत भर पडून गर्दी अनियंत्रित होऊ शकते, हे ध्यानात आल्याने मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे. २ डिसेंबरपासून ९ डिसेंबरपर्यंत ही बंदी राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

 

टॅग्स :nagpurनागपूरwardha-acवर्धाMumbaiमुंबईrailwayरेल्वे