बेरोजगार तरुण-तरुणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:21 IST2018-02-13T00:21:31+5:302018-02-13T00:21:49+5:30

‘आई-बाबा म्हणतात शिक्षण शिका अन् सरकार म्हणते भजी विका’ हा प्रकार सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा करणारा असल्याचा आरोप करीत सोमवारी विविध बेरोजगार तरुण-तरुणींचा मुकमोर्चा काढला.

Unemployed young men and women in the street | बेरोजगार तरुण-तरुणी रस्त्यावर

बेरोजगार तरुण-तरुणी रस्त्यावर

ठळक मुद्देमुकमोर्चा : सरकारी धोरणांच्या निषेधात जिल्हाकचेरीवर धडक

आॅनलाईन लोकमत
वर्धा : ‘आई-बाबा म्हणतात शिक्षण शिका अन् सरकार म्हणते भजी विका’ हा प्रकार सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा करणारा असल्याचा आरोप करीत सोमवारी विविध बेरोजगार तरुण-तरुणींचा मुकमोर्चा काढला. त्यांचा मुकमोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला. या मोर्चाची सुरुवात शिवाजी चौकातून झाली.
सरकारच्या विरोधात असलेल्या विविध घोषणाबाजीचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण-तरुणी या मुकमोर्चात सहभागी झाले होते. सदर मोर्चाने शहरातील इंगोले चौक, बजाज चौक, इतवारा चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मुकमोर्चाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने सरकारने तात्काळ पोलीस भरती, शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी बेरोजगार तरुण-तरुणींनी केली. अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला सध्या काम नसून त्यांना सरकारच्या माध्यमातून कसे सन्मानजनक काम देता येईल यासाठीचे धोरण आखावे, अशा आशयाची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या मुकमोर्चात जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Unemployed young men and women in the street