नागरिकांच्या हक्काबाबत अनभिज्ञताच
By Admin | Updated: November 18, 2014 23:00 IST2014-11-18T23:00:01+5:302014-11-18T23:00:01+5:30
प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क आहे. लोकशाही शासनप्रणालीत हा हक्क व्यक्तीला संविधानातून मिळतो. भारतीय संघराज्यातील नागरिकांना मुलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहे.

नागरिकांच्या हक्काबाबत अनभिज्ञताच
नागरिक हक्क दिन : शासनही जागृतीबाबत उदासीन
श्रेया केने - वर्धा
प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क आहे. लोकशाही शासनप्रणालीत हा हक्क व्यक्तीला संविधानातून मिळतो. भारतीय संघराज्यातील नागरिकांना मुलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहे. या माध्यमातून व्यक्तीला त्याचा विकास करण्याकरिता समान संधी प्राप्त व्हावी हा यामागील उद्देश असतो; मात्र या हक्काबांबत नागरिकांत जागृती नसल्याने ते हक्कापासून वंचित असतात. हक्काविषयी नागरिकांत असणारी ही अनभिज्ञता दूर करण्याबाबत शासकीय यंत्रणाही उदासीनता असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिक हक्क आणि त्याची जाणीव ही बाब अखेर कागदोपत्रीच असल्याचे वास्तव समोर आले आहे.
घटनेने प्रत्येक नागरिकाला मुलभूत हक्क दिले आहे; मात्र या हक्कांची जाणीव नसल्याने अनेकदा नागरिक यापासून वंचित असतात. शासनावर ही जबाबदारी असते. याचा उल्लेख घटनेत नसला तरी हक्कांविषयी जागृती करणे ही त्या राज्याचा शासनाची नैतिक जबाबदारी असते. योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, शिबिर, अभियान या माध्यमातून ही जागृकता केली जाते; मात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून ही नैतिकता पाहत नसल्याचा प्रत्यय नागरिकांना शासकीय कार्यालयात गेल्यावर येतो. योजनेविषयी योग्य माहिती न देता त्यांना धुडकावून लावण्याचा प्रकार घडतो. नागरिकांनाही हक्कांविषयी माहितीच नसल्याने ते योजनांच्या लाभापासून वंचित होत आहेत.