Unauthorized pistol holder arrest | अनधिकृत पिस्तूल बाळगणारा जेरबंद

अनधिकृत पिस्तूल बाळगणारा जेरबंद

ठळक मुद्देदहा काडतूस जप्त : बसमधून करीत होता प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : विना परवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल व दहा काडतूर तसेच दारूची शिशी असा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर-हैद्राबाद मार्गावर असलेल्या स्थिर निगरानी पथकाद्वारे नागरिकांच्या साहित्याची तपासणी करण्यात येत असून याच ठिकाणी अदिलाबाद ते नागपूर असा बसने प्रवास करीत असलेल्या सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. शेख हैदर शेख ईब्राहीम (३५) रा. अदिलाबाद, असे ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग सात वर स्थिर निगरानी पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून वाहन तपासणी मोहीम राबविली जात होती. याच दरम्यान ए.पी. ०१ झेड. ००४५ क्रमांकाची बस अडवून त्यातील प्रवाशांच्या साहित्याची तपासणी सुरू असताना बसच्या मागील आसणाखाली एक पिस्तूल अधिकाऱ्यांना दिसून आली. त्यानंतर बारकाईने पाहणी केली असता बसच्या बाहेर दहा जीवंत काडतूर आढळून आले. त्यानंतर सदर घटनेची तातडीने वडनेर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये यांची त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर बस आणि बस मधील प्रवाशांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शिवाय ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. प्राथमिक चौकशी दरम्यान साहित्य तपासणीसाठी बस थांबताच बस मधील मागील आसणावरील एक इसम पटकन पुढील आसणावर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शेख हैदर शेख ईब्राहीम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर पिस्तूल व जीवंत काडतूर त्याच्याच जवळ होते आणि तपासणीत आपण पकडले जाऊ नये म्हणून त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हे साहित्य फेकण्यात आल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. शेख हैदर शेख ईब्राहीम याच्यावर वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी अरविंद तुराळे, आकाश कसर, अरुण गुगळे, सुरज मेश्राम, शुभम वानखेडे, वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये, यादव यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

शस्त्र बाळगण्याच्या उद्देशाचा घेतला जातोय शोध
पोनकल, जिल्हा निर्मल, आंध्रप्रदेश येथील रहिवासी असलेल्या शेख हैदर शेख ईब्राहीम हा कुठल्या कारणाने शस्त्र बाळगत होता. इतकेच नव्हे तर त्याचा घातपाताचा इरादा तर नव्हता ना आदीचाचा शोध सध्या पोलीस आहेत.

पिस्तूल बाळगणाºया संशयीताला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दहा काडतूस, एक पिस्तूल, दारूची शिशी आदी साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सुरू आहे.
- आशीष गजभिये, ठाणेदार, वडनेर.

Web Title: Unauthorized pistol holder arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.