शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

'दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा...' उध्दव ठाकरेंचा पीेएम मोदींवर घणाघात

By रवींद्र चांदेकर | Published: April 22, 2024 9:52 PM

संविधानाला धक्का लावण्याचे काम - शरद पवार

रवींद्र चांदेकर/हिंगणघाट (वर्धा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व उद्योग गुजरातला पळवून नेत आहे. दुसरीकडे विदर्भात बेकारी वाढत आहे. गेल्या १० वर्षात एकही उद्योग येथे आला नाही. जगाचा पोशिंदा संकटात आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. तरीही ‘दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’ असे नरेंद्र मोदी म्हणत आहे. त्यांनी गुजरातला सर्व उद्योग नेल्याने आता मोदी यांनाही गुजरातला परत जा म्हणण्याची वेळ आली आहे, असा घणाघात उध्दवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. 

जिल्ह्यातील हिंगणघाट येथील टाका मैदानावर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, पक्ष फोडून त्यांनी गद्दारांना ५० खोके दिले. मी गेलो असतो, तर किती खोके मिळाले असते. मात्र, माझे वैभव शिवसैनिक आहे. मुलाला मुख्यमंत्री करायचे होते म्हणून मी भाजपशी युती तोडली, असे ते सांगतात. पण मुख्यमंत्री होणे म्हणजे क्रिकेट कंट्रोल बार्डाचे अध्यक्षपद आहे का, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेशी गद्दारी झाली. निवडणूक आयोगानेही मोदी, अमित शहा यांच्या दबावाखाली आमचे चिन्ह गद्दारांना दिले. ते म्हणतात, आमची नकली सेना आहे. आता हीच सेना तुम्हाला सत्तेवरून खाली खेचतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भाजपने तुरुंगात टाकले. आता ते संविधान बदलण्याची स्वप्ने पाहतात. मात्र, त्यांचे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मंचावर खासदार शरदचंद्र पवार, खासदार संजयसिंग, माजी मंत्री अनिल देशमुख, महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे, चारूलता टोकस, रोहिणी खडसे, आमदार रणजित कांबळे, माजी आमदार वसंतराव बोंडे, प्रकाश पोहरे, शिरीष गोडे, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, अॅड. सुधीर कोठारी, रविकांत बालपांडे, श्रीकांत मिरापूरकर, सुनील राऊत, राजू खुपसरे, तुषार हुमाड, अतुल वांदिले, पंढरीनाथ कापसे आदी उपस्थित होते.

संविधानाला धक्का लावण्याचे काम - शरद पवारशरद पवार गटाचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी सत्ताधारी संविधानाला धक्का लावण्याचे काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला प्रभावी यंत्रण दिली. त्यालाच सत्ताधारी नख लावू पाहात आहे. मात्र, संविधानाला हात लावल्यास हा देश पटून उठेल, असा इशारा पवार यांनी दिला. काय वाट्टेल करू, मात्र संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न झाल्यास कुणीही स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले. दोन मुख्यमंत्र्यांनी त्यांनी तुरुंगात टाकले. देशात वेगळया विचारसरणीचे लोकचं राहू नये, असे त्यांना वाटते, असा घणाघातही केला. यावेळी खासदार संजय सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवार