दुचाकीची कारला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:27+5:30

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एम.एच.३२ ए.एच. ६५०७ क्रमांकाची कार बजाज चौकाकडे जात होती. यादरम्यान ठाकरे मार्केट परिसरातील हॉटेल रामाकृष्णासमोर विरुद्ध दिशेने जाणारी भरधाव दुचाकी कारवर धडकली. या अपघातानंतर दुचाकीवरील दोन युवकांनी कारवार दगडफेक केल्याने कारचा समोरील काच फुटला तसेच धडकेत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Two wheeler hit the car | दुचाकीची कारला धडक

दुचाकीची कारला धडक

ठळक मुद्देदोघांकडून दगडफेक : ठाकरे मार्केट परिसरात काही काळ तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भरधाव दुचाकी कारवर जाऊन धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दुचाकीवरील दोघांनी कारवार दगडफे क केल्याने कारच्या समोरील काचा फुटल्या. ही घटना सकाळी साडेदहा वाजता ठाकरे मार्केट परिसरात घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे मुख्य रस्त्यावर काही काळ तणाव निर्माण होऊन वाहतूक ठप्प झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एम.एच.३२ ए.एच. ६५०७ क्रमांकाची कार बजाज चौकाकडे जात होती. यादरम्यान ठाकरे मार्केट परिसरातील हॉटेल रामाकृष्णासमोर विरुद्ध दिशेने जाणारी भरधाव दुचाकी कारवर धडकली. या अपघातानंतर दुचाकीवरील दोन युवकांनी कारवार दगडफेक केल्याने कारचा समोरील काच फुटला तसेच धडकेत कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेतली असता दुचाकीस्वार पसार झाले. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने शहर पोलिसांनी धाव घेत रस्ता मोकळा केला. यासंदर्भात अधिक महिाती जाणून घेण्याकरिता शहर पोलीस पोलीस ठाण्यातील दुरध्वनीवर संपर्क साधला असता आऊट आॅफ सर्व्हीस दाखवत होता. त्यामुळे अधिकची माहिती मिळू शकली नाही.

शहरात दुचाकीस्वारांचा धुमाकूळ
शहरात सुसाट दुचाकी चालविणाऱ्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरातील रस्त्यांवरुन चालणे कठीण झाले आहे. शहरातील प्रत्येक गल्लीबोळासह मुख्य मार्गाने सुसाट वाहने दामटविली जातात. रात्री तर दुचाकी रेस करीत वाहने पळविली जाते. एखाद्याला कट लागल्यावर युवकांना हटकल्यास त्यांच्या अंगावर चाल करुन जाणे किं वा शिवीगाळ करणे, हे प्रकार नित्याचेच असल्याने सुसाट दुचाकी पळविण्याऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Web Title: Two wheeler hit the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात