शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

दोन पोलिसांना बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:00 PM

नजिकच्या कात्री या गावातील आठवडी बाजारात मासेविक्रेते बाजार आटोपल्यावर आपल्या व्यवहारातील पैशाचा हिशोब जुळवत बसले होते. यादरम्यान अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांनी या मासेविके्रेत्यांकडे धाव घेत जुगाराचे पैसे समजून ते हिसकावून घेत मारहाण केली.

ठळक मुद्देकात्रीच्या आठवडी बाजारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : नजिकच्या कात्री या गावातील आठवडी बाजारात मासेविक्रेते बाजार आटोपल्यावर आपल्या व्यवहारातील पैशाचा हिशोब जुळवत बसले होते. यादरम्यान अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांनी या मासेविके्रेत्यांकडे धाव घेत जुगाराचे पैसे समजून ते हिसकावून घेत मारहाण केली. त्यामुळे संतप्त मासेविक्रेत्यांसह काही गावकऱ्यांनी या दोन्ही पोलीस कर्मचाºयांचा चागलेच बदडले. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.कात्री येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. लगतच्या नदीपात्रातून मासेमारी करुन आलेले मासे या बाजारात विक्रीसाठी ठेवले जातात. रविवारी सुद्धा मासेविक्रेत्यांनी बाजारात मासे विकले. रात्री साडेआठ वाजता दरम्यान बाजार झाल्यानंतर सर्व मासेविक्रेते एकत्र येऊन आपल्या व्यवहारातील हिशोबाजी जुळवा-जुळव करीत होते. तेवढ्यात अल्लीपूर पोलीस ठाण्यातील शिपाई सचिन सुरकार व राजरत्न खडसे हे दोघे आठवडी बाजारात आले. त्यांना मासेविक्रेते एकत्र येऊन पैशाची देवान-घेवान करताना दिसून आल्याने त्यांनी जुगाराचे पैसे समजून ते हिसकावित काही मासेविक्रेत्यांना दमदाटी व मारहाण केली. दिवसभर बाजारात उन्हातान्हात मेहनत करुन थकलेले मासेविक्रेते या पोलीस कर्मचाºयांना समजविण्याचा प्रयत्न करीत होते. पण, पोलीस कर्मचारी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीस कर्मचाºयांची ही दंडेली पाहून उपस्थित नागरिकांनीही मासेविक्रेत्यांची बाजू घेत कर्मचाºयांना समजविण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही कर्मचाºयांनी काहींना धक्काबुक्की व धाकदपट करुन पैसे घेऊन पोबारा करण्याचा पवित्रा घेतला. अखेर कर्मचाºयांच्या या गुंडागर्दीमुळे साऱ्यांचाच तोल सुटल्याने दोघांनाही चांगलाच चोप दिला. तसेच या प्रकरणाची अल्लीपूर पोलिसांना माहितीही देण्यात आली. तेव्हा सचिन सुरकार व राजरत्न खडसे हे दोघेही कर्तव्यावर नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.हे दोघेही कर्तव्यावर असताना आणि नसतानाही हप्ता वसुलीकरिता नेहमीच परिसरात फिरत असल्याची चर्चा रंगली आहे. कर्तव्यावर नसतानाही आठवडी बाजारात जाऊन दाखविलेली कर्तव्य दक्षता कशासाठी? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.भोई समाज क्रांती दलाचे पोलीस अधीक्षकांना निवेदनमासेमारी करुन परिवाराचा सांभाळ करणाऱ्या मोसविक्रेत्यांचा काहीही दोष नसताना त्यांना जुगारी समजून मारहाण करीत पैसे हिसकाविणारे अल्लीपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सचिन सुरकार व राजरत्न खडसे यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्यावतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही जिल्हाध्यक्ष प्रमोद हजारे यांनी दिला आहे.भारसवाडा शिवारात पोलिसावर जीवघेणा हल्लातळेगाव (शा.पंत)- नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावून रात्री दुचाकी घरी जात असलेल्या पोलीस कर्मचाºयावर अज्ञान युवकांनी प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना रविवारी रात्री भारसवाडा शिवारात घडली असून पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. निलेश पेटकर, असे पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे. ते तळेगाव (श्या.पं.) येथे कार्यरत असून रविवारी रात्री कामकाज आटोपून आष्टी येथे आपल्या घरी जात होते. दरम्यान भारसवाडा शिवारात मागाहून आलेल्या दोन दुचाकीवरील युवकांनी त्यांना जबर मारहाण केली. चारही युवक तोंडाला बांधून असल्यामुळे त्यांना ओळखता आले नाही. पेटकर यांनी आष्टी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.रविवारी हे दोन्ही कर्मचारी कर्तव्यावर नव्हते. पण, आठवडी बाजारात झालेल्या प्रकाराबाबत कर्मचाºयांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. तपासाअंती या प्रकरणातील खरी माहिती पुढे येईल.- प्रविण डांगे, पोलीस निरीक्षक, अल्लीपूर.