जिल्ह्यात दोन लाख खातेधारक शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:00+5:30
वर्धा जिल्ह्यात सुमारे २ लाख ४८ हजार ३८१ खातेधारक शेतकरी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे असले तरी अद्यापही जिल्हा प्रशासनाला लेखी सूचना प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे नेमके किती शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरेल हे सध्या अस्पष्ट आहे. तर लेखी आदेशाची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.

जिल्ह्यात दोन लाख खातेधारक शेतकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनादरम्यान केली आहे. वर्धा जिल्ह्यात सुमारे २ लाख ४८ हजार ३८१ खातेधारक शेतकरी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे असले तरी अद्यापही जिल्हा प्रशासनाला लेखी सूचना प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे नेमके किती शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरेल हे सध्या अस्पष्ट आहे. तर लेखी आदेशाची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.
कुठल्याही अटी व शर्ती विना राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे येत्या मार्च महिन्यापासून कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाणार आहे. लेखी आदेशच प्राप्त न झाल्याने जिल्हा प्रशासनातील विविध विभाग सध्या संभ्रमात आहे. कर्जमाफीचा लाभ घेणाºया शेतकऱ्याचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. शिवाय ते आधारशी संलग्न असणेही क्रमप्राप्त आहे. शेतकºयाच्या अंगठ्याचा ठसा घेत त्याला कर्जमाफीचा लाभ दिल्या जाईल असे सांगण्यात येत आहे. असे असले तरी लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा लाभ देण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
मागील सरकारने दिला ९०,६६५ शेतकऱ्यांना लाभ
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यावेळी वर्धा जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी १ लाख ४० हजार ५५३ शेतकऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरले होते. त्यापैकी केवळ ९० हजार ६६५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. तर ४३ हजार ८२७ शेतकºयांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. तर नवीन ठाकरे सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाचा गांधी जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अपात्र ठरविलेल्या शेतकºयांच्या अर्जावर होतोय पुर्नविचार
विविध कारणे पुढे करून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचे आरोप होताच तालुकास्तराव समिती गठीत करण्यात आली. शिवाय सदर समितीकडून प्राप्त झालेल्या तसेच अपात्र ठरविलेल्या शेतकºयांच्या अर्जाच्या कागदपत्राची पडताळणीकरून पुर्नविचार केल्या जात आहे. त्याबाबतचा अहवाल तालुका समितींनी अजूनही जिल्हा प्रशासनाला सादर केलेला नसल्याचे सांगण्यात येते.
फडणवीसांच्या काळात दीड तर ठाकरेंच्या काळात दोन लाख
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कर्जबाजारी शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ करून दिलासा देण्यात आला. तर शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.