लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : येथील पोलीस स्टेशनसमोर भरधाव दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास झाला. रोशन वासुदेव वलके (२०) व पवन दिलीप श्रीवास्तव (२३) दोन्ही रा. स्टेशन वॉर्ड सिंदी (रेल्वे), असे मृतकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, विना क्रमांकाच्या दुचाकीने रोशन वलके व पवन श्रीवास्तव हे रेल्वे फाटकाकडून बस स्थानकाच्या दिशेने जात होते. दुचाकी पोलीस स्टेशन समोर येताच समोरूने येणाऱ्या एम. एच. ३२ ए. ८५८० क्रमांकाच्या ट्रॅक्टर व दुचाकीत धडक झाली. यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सिंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर चालक संतोष सुखराम दाते रा. पळसगाव रोड सिंदी याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:05 IST
येथील पोलीस स्टेशनसमोर भरधाव दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास झाला.
ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात दोन ठार
ठळक मुद्देपोलीस स्टेशनसमोर झाली समोरासमोर धडक