वर्धा जिल्ह्यातील परसोडा येथे दोन घरे आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:57 IST2018-04-02T18:57:26+5:302018-04-02T18:57:33+5:30

समुद्रपूर तालुक्यातील परसोडा येथे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली.

Two houses in Parsoda in Wardha district were burnt in fire | वर्धा जिल्ह्यातील परसोडा येथे दोन घरे आगीत जळून खाक

वर्धा जिल्ह्यातील परसोडा येथे दोन घरे आगीत जळून खाक

ठळक मुद्देजिवितहानी टळलीपाच लाखाच्या वर नुकसानआगीचे कारण कळले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील परसोडा येथे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली. यात कुठलेही जिवीतहानी झाली नाही. मात्र घरातील संपूर्ण सामान जळून पाच लाखांहून अधिकचे नुकसान झाले.
परसोडा येथील रामचंद्र बळीराम जमदापुरे व नत्थुजी नामदेव ठाकरे यांच्या घराला रविवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. यात जमदापुरे यांच्या घरातील तांदूळ, कपडे, घरगुती सामान जळाल्याने एकूण दोन लाखांचे नुकसान झाले. ठाकरे यांच्या घरातील गहू, डाळ व घरगुती सामान जळाल्याने तीन लाखांचे नुकसान झाले. यावेळी प्रसंगावधान राखल्याने जिवतीहानी झाली नाही.
 

Web Title: Two houses in Parsoda in Wardha district were burnt in fire

टॅग्स :fireआग