शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वाही, पिंपळझरी,पिंपळदरीवासियांचे दुष्काळाशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:58 PM

गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली.

ठळक मुद्दे६०० लोकवस्तीच्या गावात ६ हजार लोकांच्या ताकदीचे काम : तीन दिवसांत ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पिंपळझरी, पिंपळदरी, वाही, वासी या गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई जाणवू नये याकरिता कंबर कसल्याचे मंगळवारी दिसून आले. या गावातील नागरिकांनी एकजुट दाखवून संभाव्य दुष्काळाशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. गावकऱ्यांनी तिसºया दिवसापर्यंत ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण केल्याचे दिसून आले.मंगळवार स्पर्धेचा तिसरा दिवस. वैद्यकीय जनजागृती मंचाचे सदस्य डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, आशिष पड्डलवार हे वाही या गावात श्रमदान करण्यास गेले होते. तिथे त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच गारपिटीने संपुर्ण गावाचे भयंकर नुकसान झाले असताना वाही व वासी या गावांनी एकजुटीने संपुर्ण ताकदीने गावाजवळच्या टेकडीवर श्रमदान केले. स्पर्धेच्या तिसºया दिवशी त्यांनी जवळपास ८०० मिटर सीसीटीचे काम पूर्ण केले होते. पुढील कामाचेही नियोजन झालेले होते. गावात जवळपास १०० टक्के शोषखड्डे झले असून रोपवाटिकेमध्ये दीड हजार झाडांची लागवड झाली आहे. तसेच इतर जलबचतीचे उपक्रमांचेही नियोजन झालेले आहे. गारपिटीने या गावातील जवळपास सर्वच घरे क्षतिग्रस्त झालेली आहेत. तसेच काही घरे तर जमीनदोस्त झालेली आहेत. गावात पाण्याचा दुष्काळ असतानाही, हे गावकरी मात्र कुणावरही अवलंबून नाही. एकजुटीच्या ताकदिने दुष्काळाशी दोन हात करीत दररोज सकाळी श्रमदान सुरू आहे.गावातील एकजुटीच्या ताकदीने साऱ्यांनाच धक्कातीनही गाव मिळून लोकसंख्या अंदाजे सुमारे ६०० लोकसंख्या असलेल्या गावांतील लोकांचे बळ मात्र सहा हजारांचे आहे. हे येथे भेट दिल्यानंतर जाणवले. आसपासच्या स्वयंसेवी संघटनाचे श्रमदान तसेच शासकीय मदत आणि वनविभागाचे योग्य सहकार्य मिळाल्यास हे गाव निश्चितच पाणीदार होऊ शकते, असे मत पाणी फाऊंडेशनचे समन्वयक राम आंबोरे, गणेश गजकेश्वर, शंकर शिरेबंदी या ग्रामवासीयांनी मांडले. तसेच डॉ. सचिन पावडे यांनी गावकºयांची भेट घेऊन श्रमदानासाठी पाच कुदळ, पाच फावडे, १० घमेले, तसेच एक सब्बल भेटस्वरूप दिली. तसेच वॉटर कप स्पर्धेचे स्वरूप तसेच श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले.