पढेगावात दोन शेतकऱ्यांनी फुलविली केळीची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:43 IST2018-09-13T23:42:06+5:302018-09-13T23:43:30+5:30
तालुक्यातील पढेगाव येथील शेतकरी सुभाष घायवट यांनी तीन एकर शेतात पवनारचे केळी उत्पादक शेतकरी कुंदन वाघमारे यांच्या मार्गदर्शनात केळी लागवड केली. सद्यास्थित केळीची बाग चांगलीच बहरली आहे.

पढेगावात दोन शेतकऱ्यांनी फुलविली केळीची बाग
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : तालुक्यातील पढेगाव येथील शेतकरी सुभाष घायवट यांनी तीन एकर शेतात पवनारचे केळी उत्पादक शेतकरी कुंदन वाघमारे यांच्या मार्गदर्शनात केळी लागवड केली. सद्यास्थित केळीची बाग चांगलीच बहरली आहे. जिल्ह्यात सेलू तालुका केळी उत्पादनात अग्रेसर असला तरी वर्धा तालुक्यातील पढेगाव येथील सुभाष घायवट यांनी तीन एकर शेतामध्ये २० एप्रिलला ४ हजार ५०० केळीचे रोपटे लावलीत. या रोपट्याकरिता त्यांना ७४ हजार रूपये मोजावे लागले. सदर रोपटे जळगाव येथील टीश्यू कल्चर मधून आणण्यात आली. तसेच ड्रीपचा खर्च दीड लाख रूपये तर एक लाख रूपयाचे शेणखत टाकण्यात आले. लागवड व निंदन खर्च २० हजार रूपये झाला. आतापर्यंत एकूण खर्च जवळपास साडे चार ते पाच लाख रूपये खर्च झाला आहे, असे घायवट ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते. रासायनिक खतामध्ये १०-२६-२६ व १२-६१, आणी पोटॅश, युरीया, मॅग्नेशीयम, बोरान आदी खताचे द्रावण करून ड्रीपच्या सहाय्याने केळीच्या झाडाला पुरविल्या जाते. महिन्यातून ७ ते ८ वेळा केळीच्या झाडाला गुळ, बेसन, दही व एम, सोलेशन आदीचे द्रावन करून ड्रीपद्वारे प्रत्येक केळीच्या झाडाला पुरविल्या जाते. सदर वस्तुचे मिश्रण करण्याकरिता ड्रामाचा वापर केला जात आहे व महिन्यातून दोन वेळा झाडांना पुरविण्यात येतात. केळीची लागवड करायला पाच महिन्याचा कालावधी झाला आहे. पण केळीच्या झाडांनी १० ते १२ फुटाची उंची गाठली आहे हे विशेष. तसेच पढेगाव येथीलच शेतकरी विनोद सातपुते यांनी सुध्दा तीन एकर शेतात केळीची लागवड केली आहे. व त्यांनी सुध्दा याच पध्दतीचा अवलंब करून कुंदन वाघमारे यांचे मार्गदर्शन घेतले. सध्या स्थित यांची केळी बाग चांगलीच बहरली आहे. एकरी ३ ते ४ लाख रू. उत्पन्न होईल अशी आशा दोन्ही शेतकºयांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात केळीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती केळी उत्पादक शेतकरी कुंदन वाघमारे यांनी दिली.