रेल्वे रुळावरून पार्सल व्हॅनचे दोन डबे घसरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 20:01 IST2020-05-31T20:00:56+5:302020-05-31T20:01:06+5:30
रविवारी सायंकाळच्या सुमारास आठ डब्ब्यांची मालगाडी वर्ध्याकडून चंद्रपूरकडे पार्सल घेऊन जात होती.

रेल्वे रुळावरून पार्सल व्हॅनचे दोन डबे घसरले
वर्धा : वर्ध्याकडून चंद्रपूरकडे जाणा-या पार्सल रेल्वेगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात टळला, ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वर्धा रेल्वेस्थानकावर घडली. लॉकडाऊन असल्याने रेल्वेने साहित्याची ने-आण करणे सुरू आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास आठ डब्ब्यांची मालगाडी वर्ध्याकडून चंद्रपूरकडे पार्सल घेऊन जात होती.
बजाज चौकातील उड्डाणपूल पार करताच रेल्वेगाडीचे पाच आणि सहा क्रमांकाचे दोन डबे अचानक रूळावरून घसरले. पाच क्रमांकाच्या डब्याचे एक चाक आणि एक स्प्रिंग तुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. ही मालगाडी चौथ्या लाईनवरून जात असल्याने अप-डाऊनच्या मुख्य लाईनवर याचा प्रभाव पडला नाही. मालगाडी दुरुस्तीचे काम सुरू असून, चार ते पाच तास दुरुस्तीचे काम चालणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.