दोन अपघातांत दोघे ठार

By Admin | Updated: December 23, 2015 02:47 IST2015-12-23T02:47:54+5:302015-12-23T02:47:54+5:30

तळेगाव (श्या.) व सेलू तालुक्यात झालेल्या दोन अपघातांच्या घटनेत दोघे ठार झाले तर चार जखमी झाले. दोनही अपघात मंगळवारी झाले.

Two casualties killed both | दोन अपघातांत दोघे ठार

दोन अपघातांत दोघे ठार

चारजण जखमी : तळेगाव व सेलू येथील घटना
तळेगाव (श्या.पं.)/ सेलू : तळेगाव (श्या.) व सेलू तालुक्यात झालेल्या दोन अपघातांच्या घटनेत दोघे ठार झाले तर चार जखमी झाले. दोनही अपघात मंगळवारी झाले.
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील तळेगाव (श्या.पं.) येथील इंदरमारी फाट्याजवळ भरधाव जीप ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येत असलेल्या ट्रकवर आदळली. यात जीप चालकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवाशी जखमी झाले. अविनाश रामेश्वर राठोड (२५) रा. रानवाडी असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री इंदरमारी शिवारात ट्रकला ओव्हरटेक करत असताना मागाहून भरधाव येणाऱ्या एमएच ३१ ईए ५९५५ क्रमांकाची कार समोरून येत असलेल्या एमएच २७ एक्स ४९६ क्रमांकाच्या ट्रकवर आदळली. यात चालक अविनाश रामेश्वर राठोड हा गाडीमध्येच दबल्या गेल्यामुळे जागीच ठार झाला. तर वाहनातील घनश्याम भुयार (३८), शुभांगी घनश्याम भुयार (३०) व आकाश खापरे (२८) सर्व रा. तळेगाव हे जखमी झाले. भुयार परिवार काही कामानिमित्त मदनी येथे गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. यातील जखमींना तळेगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश झामरे, पोलीस उपनिरीक्षक पटले, प्रमोद हरणखेडे, आशिष नेहारे, कैलास चौबे यांनी वाहनात अडकलेल्या चालकाला दुसऱ्या वाहनाच्या सहाय्याने गाडीचे पत्रे ओढून बाहेर काढले.(वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)

Web Title: Two casualties killed both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.