स्पर्धेतून दोन व्यावसायिकांत वाद

By Admin | Updated: August 18, 2016 00:45 IST2016-08-18T00:45:43+5:302016-08-18T00:45:43+5:30

व्यवसायातील स्पर्धेवरून दोन दुकानदारांमध्ये वाद उफाळला आहे. बुधवारीही सकाळी दोन्ही दुकान मालकांमध्ये वाद झाला.

Two businessmen from the competition | स्पर्धेतून दोन व्यावसायिकांत वाद

स्पर्धेतून दोन व्यावसायिकांत वाद

शहरातील घटना : परस्पर विरोधात गुन्हा दाखल
पुलगाव : व्यवसायातील स्पर्धेवरून दोन दुकानदारांमध्ये वाद उफाळला आहे. बुधवारीही सकाळी दोन्ही दुकान मालकांमध्ये वाद झाला. या प्रकरणी परस्परांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
गांधी चौकात प्रकाश सुखिजा यांचे तर समोरील बाजूस सचिन भोयर यांचे आॅप्टीकल दुकान आहे. या दोन्ही व्यावसायिकांमध्ये मागील काही महिन्यांपासून व्यावसायिक स्पर्धा निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी व्यवसायाच्या वादातूनच भांडण झाले. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने गुन्हे नोंदविण्यात आले. प्रथम प्रकाश अशोक सुखिजा यांच्या तक्रारीमध्ये सतीश भोयर, सचिन भोयर आणि संदीप भोयर यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद आहे. सचिन भोयर यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी प्रकाश सुखिजा, भारत नागपाल व सुमित सिद्धानी यांनी फायटरने मारहाण करून जखमी केल्याचे नमूद आहे. सचिनवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारींमुळे पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी प्रकाश सुखिजा, भारत नागपाल, सुमीत सिद्धानी व आणिखी एक यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला. सचिन भोयर यांच्या विरूद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. सचिन शिवसेनेचा तर प्रकाश भाजपाचा कार्यकर्ता आहे. यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांच्यासह सेनेचे तसेच भाजपाचे शहर प्रमुख मंगेश झाडे, नितीन बडगे सह दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आमनेसामने आले; पण अनुचित प्रकार टळला.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Two businessmen from the competition