शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

विसाव्या पशुगणनेत जिल्ह्यातील पशुधन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 5:00 AM

विसाव्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गायी एकूण २ लाख ७५ हजार ८८०, म्हशी ४६ हजार ६४९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९, मेंढ्या ५ हजार ३५८ तर वराहांची संख्या ५९० इतकी आहे. पशलसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ व्हावे याकरिता पशुगणना होते. यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने टॅबद्वारे गणना झाली.

ठळक मुद्देवाढत्या शहरीकरणाचा परिणाम : शेळ्या-मेंढ्यांची संख्याही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने झालेल्या २०व्या पशुगणनेत पाळीव पशुंच्या संख्येत घट झालेली आहे. झपाट्याने होत असलेले शहरीकरण, चारा सोडून नगदी पिके घेण्याकडे असलेला शेतकऱ्यांचा कल याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.ग्रामीण भागात शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा जोडधंदा केला जातो. यातून घरखर्च बऱ्यापैकी निघतो. मात्र, उन्हाळ्यात भासणारी वैरण टंचाई, पशुखाद्याचे गगनाला भिडणारे दर यामुळेही पशुपालनात घट होत असल्याचे दिसून येते. देशात जनगणना दर दहा वर्षांनी तर पशुगणना दर पाच वर्षांनी होते. १९ वी पशुगणना २०१२ मध्ये पूर्ण झाली. २०१२ च्या १९ व्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गार्इंची संख्या ३ लाख ४ हजार ३५९, म्हशी ४८ हजार ७९३, शेळ्या १ लाख ३० हजार ३४२, मेंढ्या १ हजार ६८५, वराहांची संख्या २ हजार ८१० इतकी होती.विसाव्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गायी एकूण २ लाख ७५ हजार ८८०, म्हशी ४६ हजार ६४९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९, मेंढ्या ५ हजार ३५८ तर वराहांची संख्या ५९० इतकी आहे. पशलसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ व्हावे याकरिता पशुगणना होते. यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने टॅबद्वारे गणना झाली.जिल्ह्यात पशुधनाची संख्या प्रशासनाच्या लेखी घटती असली तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादन घेतले जाते. त्यामुळे विसाव्या पशुगणनेनुसारच जिल्ह्यात पाळीव जनावरांची संख्या असल्याने १९ व्या पशुगणनेनुसार जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाची दर्शविली जाणारी आकडेवारी साशंकता निर्माण करणारी ठरत आहे.गार्इंच्या संख्येत २८ तर म्हशींच्या संख्येत २ हजारांनी झाली घट१९ व्या पशुगणनेच्या तुलनेत संकरित आणि देशी गार्इंची संख्या २८ हजार ४७९, तर म्हशींच्या संख्येत २ हजार १४४ ने घट झालेली आहे. मात्र, शेळ्यांच्या संख्येत ३१ हजार १७, तर मेंढ्यांच्या संख्येत ३ हजार ६७३ ने वाढ झालेली असल्याने शेतकºयांचा पशुपालनासोबतच शेळीपालनाकडेही मोठा कल दिसून येत आहे.

टॅग्स :cowगाय