ट्रक धडकले; एक जागीच ठार

By Admin | Updated: July 19, 2015 02:08 IST2015-07-19T02:08:46+5:302015-07-19T02:08:46+5:30

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात एका ट्रकमधील वाहक जागीच ठार झाला.

Truck shocks; Killed at one place | ट्रक धडकले; एक जागीच ठार

ट्रक धडकले; एक जागीच ठार

कवठा शिवारातील घटना : ट्रक चालक फरार
पुलगाव : विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात एका ट्रकमधील वाहक जागीच ठार झाला. यात आरोपी ट्रक चालक घटनास्थाळावरुन पसार झाला. ही घटना पुलगाव-वर्धा मार्गावर कवठा शिवारात शुक्रवारी रात्री घडली. अल्पेश सुरचंद कोडवाते रा. सुंदरटोला, तुमसर असे मृतकाचे नाव आहे.
पोलीस सुत्रानुसार ट्रक क्र. एमएच ४० वाय ७१९१ हा टमाटर भरून नगर येथून नागपूरकडे जात होता. यादरम्यान ट्रक क्र. एमएच १२ बीटी ४६२५ हा वर्धेवरुन पुलगावकडे येत होता. कवठा परिसरात ये दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात पुलगावकडे येत असलेल्या ट्रकमधील वाहक अल्पेश सुरचंद कोडवाते रा. सुंदरटोला, तुमसर हा घटनास्थळीच ठार झाला. घटना घडताच नागपूरकडे जात असलेल्या ट्रकमधील चालक व वाहक घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस जमादार सुभाष कोसुलकर यांनी पंचनामा केला. याप्रकरणी फरार ट्रक चालकाच्या विरोधात पुलगाव ठाण्यात भादंवीच्या कलम २७७, ३०४, ३३७ आणि मोटर वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Truck shocks; Killed at one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.