सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदी टीआरएन प्रभू यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:33 IST2018-03-14T15:33:39+5:302018-03-14T15:33:47+5:30

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली.

TRN Prabhu elected as Sevagram Ashram President | सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदी टीआरएन प्रभू यांची निवड

सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदी टीआरएन प्रभू यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली.
प्रभू यांनी गांधी दर्शन आणि राष्ट्रभाषा हिंदीत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा जन्म केरळ येथे २९ मे १९४७ ला झाला. गांधीजींच्या जन्म शताब्दी वर्षात त्यांनी सर्वोदय आंदोलनात सहभाग घेतला होता. तसेच सर्वोदयाचे अग्रणी नारायण देसाई यांच्या नेतृत्वात त्यांनी शांती सेनेचे प्रशिक्षण घेतले आहे. केरळ येथे युवा शांती सेना संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. १९७५ आणीबाणीत त्यांना कारावास भोगावा लागला. १९७७ ला लोक नायक जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनीतही त्यांनी काम केले आहे. गांधी विचारांवर आधारीत पुर्णोदय बुक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष आहे. तसेच केरळ येथे गांधी शांती प्रतिष्ठानचे युवा समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. यासह सर्व सेवा संघाचे मंत्री आणि विश्वस्त म्हणून ते कार्य करीत आहेत.

Web Title: TRN Prabhu elected as Sevagram Ashram President