रस्ता दुभाजकातील झाडे झाली बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:50+5:30
शासनाचा मोठा निधी खर्च करून सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. सदर विकास काम सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आले असून उन्हाळ्याच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता दुभाजकात विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली होती.

रस्ता दुभाजकातील झाडे झाली बेपत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रीन वर्धा या उद्देशाने वर्धा शहरातील सर्वच उद्यानांचा कायापालट करण्याचा विडा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलला आहे. परंतु, वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील जिल्हा कचेरीसमोरील रस्ता दुभाजकात उन्हाळ्याच्या सुरूवातीला लावण्यात आलेली झाडे अल्पावधीतच बेपत्ता झाल्याने ग्रीन वर्धेच्या उद्देशालाच बगल मिळत आहे. विशेष म्हणजे दुर्लक्षीत धोरण अवलंबल्याने तेथील रोपटे पाण्याअभावी मरण पावल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, शासनाचा मोठा निधी खर्च करून सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. सदर विकास काम सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आले असून उन्हाळ्याच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता दुभाजकात विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली होती.
त्यावेळी या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना ही रोपटे भुरळच घालत होती. परंतु, एक वेळा रोपटे लावले आणि आपण जबाबदारीतून सुटलो याचाच अवलंब करीत लावण्यात आलेल्या रोपट्यांच्या संगोपनाकडे देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अल्पावधीतच या मार्गावरील रस्ता दुभाजकातील रोपटे मरण पावली. इतकेच नव्हे तर काही झाडांवर मोकाट जनावरांनी ताव मारला. या मार्गाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा चौक पर्यंतच्या मार्गावरील रस्ता दुभाजकात तातडीने झाड लावण्यात यावे तसेच सदर झाडांच्या संगोपनाची जबाबदारी एखाद्या विभागावर देण्यात यावी, अशी मागणी शहरातील वृक्षप्रेमींची आहे.
रस्ता रुंदीकरणात कापली डेरेदार वृक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते महात्मा गांधी पुतळा चौक या मार्गाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाच्या कामादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेली डेरेदार वृक्ष विकासाचे कारण पुढे करून कापण्यात आली. इतकेच नव्हे तर जी रोपटे रस्ता दुभाजकात लावण्यात आली. त्याच्या संगोपनाकडेही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली गेल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.