चार दिवसांपासून झाड रस्त्यावरच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:09+5:30
रस्ता खड्डेमुक्त तथा अडथळाविरहीत असणे गरजेचे आहे. नुकतीच या डांबरी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली; मात्र, लहान खड्ड्यांचे काय? असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत. शुक्रवारी रात्रीला याच रस्त्यावर जामणी गावाजवळ विटभट्टीच्या बाजूने बाभळीचे मोठे अचानक रस्त्यावर कोसळले. या झाडाने अर्धा रस्ता व्यापला आहे.

चार दिवसांपासून झाड रस्त्यावरच पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : देवळी पुलगाव हा मुख्य मार्ग असून अतिमहत्त्वाचा आहे. या मार्गावर चार दिवसांपासून झाड पडलेले आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता आहे.
या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याकरिता हा रस्ता खड्डेमुक्त तथा अडथळाविरहीत असणे गरजेचे आहे. नुकतीच या डांबरी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली; मात्र, लहान खड्ड्यांचे काय? असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत. शुक्रवारी रात्रीला याच रस्त्यावर जामणी गावाजवळ विटभट्टीच्या बाजूने बाभळीचे मोठे अचानक रस्त्यावर कोसळले. या झाडाने अर्धा रस्ता व्यापला आहे. ये-जा करणारी वाहने एकाच बाजूने न्यावी लागत असल्यामुळे रात्रीच्या वेळेला येथे मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
चार दिवसापासून ते झाड पडून असल्यामुळे वाहनचालक सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत नाराजी व्यक्त करीत आहे. झाड त्वरित उचलावे, अशी मागणी परिसरातील वाहनचालक तथा नागरिकांनी केली आहे.