शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-हैदराबाद महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स पलटली; एकाचा जागीच मृत्यू, आठ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 10:14 IST

ट्रॅव्हल्स क्रमांक सी.बी. 19 - एफ 3366 ही हैदराबाद येथून रायपूरला चालली होती.

हिंगणघाट येथील नागपूर-हैदराबाद महामार्गावर छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स पालटल्याने मोठा अपघात झाला आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा चुकविताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स पलटी झाली. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत.

ट्रॅव्हल्स क्रमांक सी.बी. 19 - एफ 3366 ही हैदराबाद येथून रायपूरला चालली होती. ट्रॅव्हल्समधून 28 प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. तर पन्नासच्या वर भरगच्च प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये भरले असल्याचे ट्रॅव्हल्समधील प्रवशांचे म्हणणे आहे. ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैद्राबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाट नजीक पोहोचली. छोटी आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्डयांचा अंदाज चालकाला आला. खड्डा चुकविताना चालकाचे ट्रॅव्हलस्ववरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. यात एक प्रवासी जागीच ठार झाला. 

गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही किरकोळ जखमी दुसऱ्या बसमध्ये बसून पुढील प्रवासाला निघून गेले आहेत. एसी कोच असलेल्या या ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने प्रवासी क्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत चालक गाडी चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्ग