दोन दिवसांत ३ हजार ११७ कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:22+5:30
विधानसभा निवडणूक पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण असून प्रशिक्षणातील प्रत्येक विषय नीट समजून घेणे गरजेचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक कामकाजाची माहिती समजावून घेत निवडणुकीचे प्रत्येक प्रपत्र काळजीपूर्वक भरावे.

दोन दिवसांत ३ हजार ११७ कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधानसभा निवडणूक पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण असून प्रशिक्षणातील प्रत्येक विषय नीट समजून घेणे गरजेचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक कामकाजाची माहिती समजावून घेत निवडणुकीचे प्रत्येक प्रपत्र काळजीपूर्वक भरावे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवाची सक्षमपणे तयारी करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले.
वर्धा विधानसभा मतदारसंघातील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण कस्तुरबा हेल्थ सोसायटी सभागृह, सेवाग्राम, वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार प्रीती डुडुलकर, महेंद्र सोनवणे उपस्थित होते. कस्तुरबा हेल्थ सोसायटी येथे सादरीकरणाद्वारे तर जी.एस कॉमर्स कॉलेज या ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. ३ हजार ११७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना २८ व २९ असे दोन दिवस चार सत्रात प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणूक काळात आपल्या सेवा निवडणूक आयोगाकडे वळत्या केल्या असून कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे बगळे म्हणाले. आयोगाच्या सूचनांचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. काही अडचणी असल्यास निवडणूक निर्णय अधिकाºयांशी संपर्क साधावा.
बॅलेट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशिनचे लाईव्ह प्रशिक्षण सुरेश बगळे यांनी दिले. मतदानाच्या दिवशी सकाळी अभिरूप मतदान घेणे अनिवार्य असून यात कमीत कमी ५० मत टाकणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे केंद्रांवर मतदारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही, याचा आढावा घेण्यात यावा. मतदान केंद्रात मोबाईल व कॅमेरा नेण्यास सक्त मनाई असून केंद्राध्यक्षांनी खबरदारी घ्यावी. मतदान करतेवेळी फोटो, व्हिडिओ अथवा सेल्फी काढण्यावर बंदी असून असे आढळल्यास पोलीसांना कळवावे, असे त्यांनी सांगितले.
अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
आर्वी - आर्वी विधानसभा मतदारसंघात मतदान पथकाचे पहिले प्रशिक्षण २८ ला पार पडले. मतदानासाठी नियुक्त अधिकाºयांनी मतदान प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्यावी. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलीही उणीव राहू नये म्हणून सगळ्या शंकाचे निरसन करून घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हरीश धार्मिक यांनी केले. मतदान केंद्राध्यक्ष व सहायक केंद्राध्यक्ष यांना मतदान प्रक्रिया व मशीन हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्व पथकांचे दोन सत्रांमध्ये न्यू रोशन सभागृहात प्रशिक्षण घेण्यात आले. त्यानंतर ३० ते ४० च्या गटांमध्ये कृषक महाविद्यालय आर्वी येथे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या नेतृत्वात तिन्ही तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात पहिल्या पथकाचे प्रशिक्षण नायब तहसीलदार अमोल कदम यांनी तर दुसºया सत्रात प्रशिक्षण नायब तहसीलदार विनायक मगर व अमोल कदम यांनी एकत्रितपणे घेतले. पहिल्या सत्रातील प्रशिक्षणाकरिता १३०० पैकी ११५० मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर दुसºया सत्रातील प्रशिक्षणाकरिता १२४२ पैकी ११५० मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एकूण प्रशिक्षणाकरिता २,५४३ पैकी २,३०० मतदान केंद्र अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, तर २४३ अनुपस्थित होते. सर्व अनुपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. असून खुलाशात संयुक्त कारण नसल्यास गैरहजर झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचाºयांवर निवडणूक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे धार्मिक यांनी सांगितले.