शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामात शेतांवर ‘टॉवर’ची तलवार

By admin | Updated: June 13, 2014 00:23 IST

औरंगाबाद ते नागपूर ७६५ केव्ही लाईनचे काम महाराष्ट्र खासगी कंपनी नागपूरच्यावतीने केले जात आहे़ यासाठी आवश्यक टॉवर्स शेतात उभे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे़ हे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना योग्य

वर्धा : औरंगाबाद ते नागपूर ७६५ केव्ही लाईनचे काम महाराष्ट्र खासगी कंपनी नागपूरच्यावतीने केले जात आहे़ यासाठी आवश्यक टॉवर्स शेतात उभे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे़ हे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे; पण यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे़ अल्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असून पिकांच्या नासाडीची नुकसान भरपाईही दिली जात नाही़ यामुळे शेतकरी त्रस्त असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे़

वीज वहनाकरिता सध्या सर्वत्र टॉवर उभारणीच्या कामांना वेग आल्याचे दिसते़ औरंगाबाद ते नागपूर या ७६५ केव्ही लाईनचे कामही नागपूरच्या एका कंपनीकडून केले जात आहे़ या कंपनीद्वारे शेतकऱ्यांना शेतजमिनीचा योग्य मोबदला दिला जात नसल्याचे समोर आले आहे़ याबाबत यापूर्वी शेतकऱ्यांमार्फत महासम्राट बळीराजा संघटनेचे अध्यक्ष विजय काकडे पाटील व विदर्भ संपर्क प्रमुख अनिल नागरे यांनी माहिती गोळा केली होती़ यात अतिशय तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिली असल्याचे दिसून आले़ शिवाय शेतात टॉवरचे काम करताना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याचे दिसून आले़ जड वाहनांच्या रहदारीमुळे जमिनही खराब होते़ यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे पीक वाया जाते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देणे गरजेचे झाले आहे़

टॉवर लाईनच्या या कामाविरूद्ध न्यायालयात दाद मागितली जाणार असून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याची बाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, जालना येथील जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस अधीक्षक या सर्वांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसोबत योग्य व स्पष्ट करार झाल्याशिवाय कंपनीने काम करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे़

संघर्ष व वाद निर्माण होऊ नये म्हणून सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट सूचना द्याव्यात़ यात ज्या शेतकऱ्याच्या शेतात टॉवरचे काम होणार असेल, त्याला टॉवर उभारण्यापूर्वी किती रक्कम देणार, त्या रकमेचा ‘पोस्ट डेटेड’ चेक देण्यात यावा, अशा सूचना देण्याची विनंती महासम्राट बळीराजा संघटनेमार्फत करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, उर्जामंत्री व सचिव उर्जा विभाग यांना देण्यात आले आहे़ टॉवरचे काम व होणारे नुकसान याचा अंदाज घेतल्यास शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यास १० लाख रुपये मिळायला हवे, अशी मागणी केली आहे़ ही मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, याची कल्पना सर्व मंत्र्यांना देण्यात आली आहे़ शरद पवार यांनाही कुरीयरमार्फत निवेदनाची प्रत सादर करण्यात आली आहे़ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची बारामती येथील निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून योग्य नुकसान भरपाई देण्यात यासवी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)