वर्धेत आज बहुजन क्रांती मोर्चाचा हुंकार
By Admin | Updated: January 5, 2017 00:36 IST2017-01-05T00:36:03+5:302017-01-05T00:36:03+5:30
अॅट्रासिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी व इतर मागण्यांकरिता, सकल बहुजन समाज

वर्धेत आज बहुजन क्रांती मोर्चाचा हुंकार
वाहतूक व्यवस्थेत बदल : अनेक रस्ते राहणार बंद
वर्धा : अॅट्रासिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी व इतर मागण्यांकरिता, सकल बहुजन समाज व इतर बांधवांकडून गुरुवारी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाकरिता वर्धा जिल्हा व इतर जिल्ह्यातून बहुजन समाज बांधव वाहनासह वर्धा शहरामध्ये येणार आहे. त्यांची व्यवस्था व शहरातील वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घेत पोलीस विभागाकडून अनेक रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ अन्वये शहरात उद्या गुरुवारी सकाळी १० ते मोर्चा संपेपर्यंत वाहतूक बंद करून ती इतर मार्गाने वळविली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना सुट आल्याचे कळविले आहे.(प्रतिनिधी)
पार्किंग व्यवस्था
बहुजन क्रांती मोर्चाकरिता सेलू, सिंदी रेल्वे, बुट्टीबोरी, नागपूर कडून येणाऱ्या वाहनांकरिता - हिरो शोरूमच्या पाठीमागील यशवंत कॉलनीमधील मैदान
हिंगणघाट, वायगाव कडून येणारे वाहनांकरिता - गणेश नगर ले-आऊट
अमरावती, यवतमाळ, देवळी, पुलगाव कडून येणाऱ्या वाहनांकरिता - होन्डा शोरूम
अमरावती, तिवसा, आष्टी ताळेगाव आर्वी कडून येणाऱ्या वाहनांकरिता - शनी मंदिर मैदान
सिंदी, दहेगाव, हमदापूर, समुद्रपूर, जाम, सेवाग्राम कडून येणाऱ्या वाहनांकरिता - महिला आश्रम ग्राऊंड