शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पर-ट्रेलरची समोरासमोर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 23:54 IST

वर्धा-नागपूर मार्गावर कान्हापुर गोंदापुर नजिकच्या वळणावर ट्रेलर व टिप्परची समोरासमोर धडक झाली. यात ट्रेलरचा चालक रोहिदास रामभाऊ मारक (२५) रा. सातेगाव ता. शेगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर टिप्परचा चालक विजय श्रीलालमन रज्जाक हा गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देएक गंभीर : वर्धा-नागपूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/आकोली : वर्धा-नागपूर मार्गावर कान्हापुर गोंदापुर नजिकच्या वळणावर ट्रेलर व टिप्परची समोरासमोर धडक झाली. यात ट्रेलरचा चालक रोहिदास रामभाऊ मारक (२५) रा. सातेगाव ता. शेगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर टिप्परचा चालक विजय श्रीलालमन रज्जाक हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला गॅसकटरने दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. हा अपघात दुपारी १२ च्या सुमारास झाला. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच राहिल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती.मृतक हा त्याच्या ताब्यातील एम.एच.४६ बी.बी. ४४३३ क्रमांकाचे जडवाहन घेवून वर्धेकङून नागपूरच्या दिशेने जात होता. तर गंभीर जखमी हा त्याच्या ताब्यातील एम.पी. ३९ एच. १३७४ क्रमांकाचे जड वाहन घेवून नागपूरकडे जात होता. दोन्ही वाहने कान्हापूर नजीकच्या वळण रस्त्या परिसरात आले असता दोन्ही वाहनांमध्ये समारासमोर धडक झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळता सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, वामन घोडे, जमादार किशोर कापडे व मनिष कांबळे यांची आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेवून जखमीला रुग्णालयाकडे रवाना करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.ट्रेलरने चिमुकलीला चिरडलेकेळझर - भरधाव ट्रेलरने पाच वर्षीच चिमुकलीला चिरडले. हा अपघात सोमवारी नजीकच्या आमगाव (खडकी) शिवारात झाला. दुर्गा अंकुश पंधराव, असे मृतक मुलीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच वर्षीय दुर्गा ही तिच्या आजीसोबत घराकडे जात होती. ते दोघेही वर्धा-नागपूर हा महामार्ग ओलांडत असताना भरधाव असलेल्या ट्रेलरने दुर्गाला धडक दिली. यात दुर्गाच्या अंगावरून या जडवाहनाचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रेलर चालक पलविंदरसिंग निर्मलजीत सिंग (३५) रा. रायपूर (छत्तीसगढ) याच्याविरुद्ध सिंदी पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सिंदी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी जावेद धमिया करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू