गोव्यावरून परत येणाऱ्या पुलगावच्या ‘अनिल’वर काळाची झडप; चौघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 05:00 IST2022-02-02T05:00:00+5:302022-02-02T05:00:13+5:30

अनिल आणि त्याचे चार मित्र गोवा येथील निसर्गरम्य वातावरण तसेच तेथील विविध स्थळांची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुलगाव येथून कारने गोवा राज्यात गेले होते. गोवा राज्यातील विविध स्थळ बघितल्यावर ते परतीचा प्रवास करीत होते. ते वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) शिवारातील समृद्धी महामार्गाने वर्धेच्या दिशेने येत असताना भरधाव कार अनियंत्रित होत पुलाखाली कोसळली. यात कारमधील पाचही व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना  रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अनिल याला मृत घोषित केले.

Time flies over ‘Anil’ from Pulgaon returning from Goa; Four serious | गोव्यावरून परत येणाऱ्या पुलगावच्या ‘अनिल’वर काळाची झडप; चौघे गंभीर

गोव्यावरून परत येणाऱ्या पुलगावच्या ‘अनिल’वर काळाची झडप; चौघे गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : पुलगाव येथून गोवा येथे पर्यटनासाठी गेलेल्या पाच तरुणांचा परतीच्या प्रवासादरम्यान भरधाव वाहन अनियंत्रित झाल्याने वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथे मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास अपघात झाला. यात पुलगाव येथील नानाजी ऊर्फ अनिल पाटेकर याचा मृत्यू झाला, तर त्याचे चार मित्र गंभीर जखमी झाले. परवेज चिन्नेवार, विकास पाखरे, प्रवीण बिरे, गावंडे अशी जखमींची नावे आहेत.
अनिल आणि त्याचे चार मित्र गोवा येथील निसर्गरम्य वातावरण तसेच तेथील विविध स्थळांची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुलगाव येथून कारने गोवा राज्यात गेले होते. गोवा राज्यातील विविध स्थळ बघितल्यावर ते परतीचा प्रवास करीत होते. ते वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) शिवारातील समृद्धी महामार्गाने वर्धेच्या दिशेने येत असताना भरधाव कार अनियंत्रित होत पुलाखाली कोसळली. 
यात कारमधील पाचही व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना  रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अनिल याला मृत घोषित केले. तर उर्वरित चार व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची मालिका सुरुच...
-   देवळी नजीकच्या सेलसुरा गावाजवळ भदाडी नदीच्या पुलात वाहन कोसळून सात भावी डाॅक्टरांचा मृत्यू झाला. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा दोन अपघात झाले. एक अपघात तळेगाव (श्या.पं.) गावाजवळ झाला तर दुसऱ्या अपघातात पुलगाव येथील इसम ठार झाला. 

 

Web Title: Time flies over ‘Anil’ from Pulgaon returning from Goa; Four serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात