शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

तालुक्यातील १८ हजार तूर उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:34 PM

एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देतूर पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण : उत्पादनात होणार घट

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.तालुक्यातील सुमारे १८ हजार शेतकऱ्यांनी यंदाच्यावर्षी तूर पिकाची लागवड केली. तशी नोंदही तालुका कृषी विभागाने घेतली आहे. वेळोवेळी निगा घेतल्याने पिकाची उंचीही बºयापैकी वाढली. सध्या तूर पीक फुलावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना अचानक झाडच वाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात थंडी वाढली आहे. वाढत्या थंडीमुळेच व वातावरणातील बदलामुळेच तूर पीक करपत असल्याचे काही शेतकरी सांगतात. परंतु, वास्तविकता काय आहे याची पाहणी करून तूर उत्पादक शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आर्वी तालुक्यातील वाढोडा, वागदा, अहिरवाडा, देऊरवाडा, नांदपूर, सर्कसपूर, माटोडा, एकलारा, लाडेगाव, टाकरखेड, जळगाव, निंबोली (शेंडे), टोणा, वर्धमनेरी, रोहणा, सालफळ, सायखेडा, दिघी, वडगाव (पांडे), चांदणी, गुमगाव, चिंचोली (डांगे), पिंपळखुटा, दहेगाव, पाचेगाव, बाजारवाडा, हैबतपूर, पिपरी, टोणा आदी शेत शिवारांमधील तूर पिकांवर दिसून येतो. त्यामुळे तेथील तूर उत्पादकांच्या संकटात भर पडली आहे. शिवाय उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात असून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.गेल्या आठ दिवसांपासून थंडी वाढली आहे. इतकेच नव्हे तर आपण यंदा चार एकरात तुरीची लागवड केली. परंतु, अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या हे पीक वाळत आहे. उपाययोजनांसाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.- भास्कर चौकोणे,शेतकरी, दहेगाव (मु.).अत्यल्प पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम तूर पिकावर होत आहे. शेतकºयांनी सायंकाळच्या वेळी तूर पिकाच्या काठावर शेकोटी पेटवावी. १० डिग्रीपेक्षा कमीचे तापमान तूर पिकाला मानवत नाही.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती