माजी नगराध्यक्षाला तीन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2015 02:27 IST2015-07-02T02:27:33+5:302015-07-02T02:27:33+5:30
येथील तत्कालीन माजी नगराध्यक्ष श्याम मसराम यांनी विद्युत कार्यालयात जाऊन एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला होता. तसेच मारहाणही केली होती.

माजी नगराध्यक्षाला तीन वर्षे कारावास
हिंगणघाट : येथील तत्कालीन माजी नगराध्यक्ष श्याम मसराम यांनी विद्युत कार्यालयात जाऊन एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला होता. तसेच मारहाणही केली होती. या प्रकरणात येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यू. एन. पाटील यांनी बुधवारी मसराम यांना दोषी ठरवून तीन वर्षाचा सश्रम कारावास व एकूण सात हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
श्याम मसराम हे येथील न. प. चे अध्यक्ष असताना स्थानिक विद्युत कार्यालयाकडून शहरात विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नव्हता. तसेच त्यांच्या तक्रारीकडे विद्युत विभाग कानाडोळा करीत होता. त्यामुळे संतापून मसराम हे थेट विद्युत कार्यालयात पोहचले आणि रआगाच्या भरात तत्कालीन अभियंता राठोड यांनी ला शिवीगाळ व मारहाण केली होती. त्यावरून हिंगणघाट पोलिसांनी पीडित अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३३२, ४५३, २९४, व ३२३ अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. यावरून न्यायालयात साक्ष व पुरावे तपासून बुधवारी मसराम यांना तीन वर्षांचा कारावास व सात हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेविरूद्ध अपील करण्यासाठी मसराम यांनी दंडाची रक्कम भरून शिक्षेला अपील काळापर्यंत स्थगित ठेवण्यासाठी जामिनावर सुटका करून घेतली.(तालुका प्रतिनिधी)