शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात वाळू चोरट्यांची तीन वाहने जप्त ; मालकांना ठोठावला ९.७० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

Wardha News रविवारी रात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये तीन वाहने जप्त केली असून वाहनमालकांना ९ लाख ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले आहे.

ठळक मुद्देसुरगावमध्ये कारवाई कधी?सेलू तहसीलची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वाळू चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी वर्धा उपविभाग आता कामाला लागला आहे. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी देवळी, वर्धा आणि सेलू तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिल्याने देवळी पाठोपाठ आता सेलू तालुक्यातही वाळू चोरट्यांविरुद्ध धाडसत्र सुरु केले आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये तीन वाहने जप्त केली असून वाहनमालकांना ९ लाख ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले आहे.कोरोनाकाळात शासकीय यंत्रणा साथरोग नियंत्रणाच्या कामात व्यस्त असताना वाळू चोरट्यांनी महसूल, पोलीस विभागाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करुन बेदारकपणे वाळूउपसा चालविला आहे. त्यामुळे कोट्यवधीच्या महसुलाची होणारी लूट थांबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी बगळे यांनी तिन्ही तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिलेत.

त्यानुसार देवळी तालुक्यामध्ये पंधरा दिवसांत तब्बल १८ वाहने जप्त करुन १८ लाख ४३ हजारांचा दंड ठोठावला. आता सेलू तालुक्यातही कारवाईला गती दिली असून एकाच दिवशी तीन वाहने जप्त करण्यात आली आहे.यामध्ये इरशाद खान रा. सेलू याच्या मालकीच्या एम.एच.३२ ऐ.जे. ७८६२, राजेंद्र झोड रा. रेहकी याचे एम.एच.३२ पी.१३३९ (ट्रॉली-एम.एच.३२-०५९५) तर सातपुते याच्या मालकीच्या एम.एच.३२ अ?े. ९३९९ (ट्रॉली-एम.एच.३२ पी.५१६२) क्रमांकाच्या वाहनांचा समावेश आहे. इरशाद खान याला ७ लाख ५० हजार, राजेंद्र झोड याला १ लाख तर सातपुतेला १ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल, असे उपविभागीय अधिकारी बगळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे काही लोकप्रतिनिधींच्या आशीवार्दाने सुरगाव व महाकाळ या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. येथील वाळू ही वर्धा व सेलू शहरात पुरविल्या जात आहे. सुरगावात स्थानिकांकडूच वाळू चोरी सुरु असून भर दिवसा वाहतूक केली जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कामडीला ४ लाख ६० हजारांचा दंडसारेच अधिकारी आपल्या खिशात असल्याचा अविभार्वात वावरणाऱ्या सोलोड येथील रेती चोरटा अमोल कामडीला अखेर महसूल विभागाने हिसका दाखविलाच. चणा (टाकळी) येथील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करीत असताना गुरुवारी रात्री कारवाई करुन ट्रॅक्टर व ट्रक अशी दोन वाहने जप्त केली. त्याला एका वाहनाचे २ लाख ३७ हजार ४०० तर दुसऱ्या वाहनाचे २ लाख २३ हजार ४०० असा एकूण ४ लाख ६० हजार ८०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. सोबतच पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अट्टल चोरटा असल्याने आता उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर झालेल्या कारवाईची माहिती गोळा करायला सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे होणाऱ्या कारवाईकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.फरताडेला भरावे लागणार ७ लाख ७२ हजारअमोल कामडीसोबतच वाळू चोरी करणारा गिरोली येथील विवेक फरताडेही याचाही ट्रॅक्टार चणा (टाकळी) येथील कारवाईत हाती लागल्याने जप्त करण्यात आला आहे. त्याला १ लाख २२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.फरताडे याच्याकडे यापूर्वीच्या कारवाईतील ६ लाख ५० हजार रुपयांचा दंड शिल्लक असून तो दंडही आता वसूल केला जाणार असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याने फरताडेला ७ लाख ७२ हजार रुपये प्रशासनाच्या तिजोरीत जमा करावे लागणार आहे.

 

 

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिस